मी नेता हाेण्यासाठी नव्हे तर विचार जपण्यासाठी राजकारणात आलो; रोहित पवारांची भाजपसह काकांवर टिका

By मुरलीधर भवार | Updated: September 22, 2023 22:01 IST2023-09-22T22:01:18+5:302023-09-22T22:01:26+5:30

नेता होण्यासाठी आलो नाही असा टोलाही त्यांनी त्यांचे काका अजित पवार यांना लगावला आहे.

I came into politics not to be a leader but to preserve ideas; | मी नेता हाेण्यासाठी नव्हे तर विचार जपण्यासाठी राजकारणात आलो; रोहित पवारांची भाजपसह काकांवर टिका

मी नेता हाेण्यासाठी नव्हे तर विचार जपण्यासाठी राजकारणात आलो; रोहित पवारांची भाजपसह काकांवर टिका

कल्याण- काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी रोहित पवार हे अजून पाळण्यात आहेत अशी टिका केली होती. त्या टिकेला उत्तर देताना राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी मी राजकारणात विचार जपण्यासाठी आलो आहे. नेता होण्यासाठी आलो नाही, असा टोलाही त्यांनी त्यांचे काका अजित पवार यांना लगावला आहे.

भाजपने केलेले सर्वेक्षणाचे रिपोर्ट हे भाजपची परिस्थिती ठिक नसल्याचे दाखवित आहे. त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. त्यानंतरही भाजपची स्थिती सुधारत नाही. हे पाहता भाजपने शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला. सत्तेसाठी ही फोडाफोडी करुन देखील त्यांची परिस्थिती काही सुधारलेली नाही अशी टिका रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे. 
कल्याण येथील स्प्रींग टाईम हा’टेलच्या सभागृहात इंडिया आघाडीच्या सभेचे आयोजन आज करण्यात आले होते. या प्रसंगी युवा नेते आमदार पवार यांनी भाजपसह त्यांच्या काकांवर टिका केली. या सभेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांच्यासह पदाधिकारी वंडार पाटील, संदीप देसाई, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे, का’ंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, आम आदमीचे धनंजय जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.

युवा नेते पवार यांनी सांगितले की, ठाणे जिल्हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. त्यांचे चिरंजीव खासदार आहे. शिवाय या भागात भाजपचे खासदार केंद्रीय मंत्री आहेत. याठिकाणच्या जनतेशी गप्पा मारल्यावर कळाले की याठिकाणी विकास झालेला नाही. या भागात आराेग्याच्या वाहतूक कोंडीच्या समस्या आहेत. महिलांवर हल्ले होता. रस्ते खराब आहे.

युवा नेते पवार यांनी सांगितले की, वांद्रे येथून कल्याणच्या सभेला येण्यासाठी निघालो. तेव्हा गुगलवर वाहतूकीची स्थिती जाणून घेतली. तेव्हा गुगल महाशयांनी तीन तास लागणार असे सांगितल्यावर मी रेल्वे ट्रेनने कल्याणला येणे पसंत केले. कल्याणला आल्यावर एका कार्यकर्त्याच्या घरी जाण्यासाठी महाल ४५ मिनीटे लागली. तर परत सभेच्या ठिकाणी पोहचण्याकरीता अर्धा तास लागला.

Web Title: I came into politics not to be a leader but to preserve ideas;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.