पत्नीची गळा दाबन हत्या केल्या प्रकरणी पतीला अटक

By मुरलीधर भवार | Updated: March 7, 2024 20:23 IST2024-03-07T20:23:24+5:302024-03-07T20:23:40+5:30

टिटवाळा पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत.

husband arrested in case of strangulation of wife | पत्नीची गळा दाबन हत्या केल्या प्रकरणी पतीला अटक

पत्नीची गळा दाबन हत्या केल्या प्रकरणी पतीला अटक

मुरलीधर भवार, कल्याण- लग्न होऊन तीन वर्षे झाली मात्र पती पत्नीला वेळ देत नसल्याचा आरोप करीत दोन्ही पती पत्नीमध्ये वाद सुरु झाले. अखेर वाद विकोपाला गेले पतीने पत्नीची गळा दाबून निर्दयीपणे हत्या केली. ही हत्या नसून आत्महत्या असल्याचे भासविले. पोलिसांनी त्याचा प्रयत्न उधळून लावला आहे. दिपा मोहपे या महिलेच्या हत्ये प्रकरणी तिचा पती महेश मोहपे याला टिटवाळा पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत.

दोघांचा २०२१ मद्ये प्रेम जुळले. त्यानंतर त्यांनी विधीवत लग्न केले. लग्नानंतर वाद सुरु झाला. पती तिला वेळ नाही या कारणावरुन दोघांमध्ये खटके उडू लागले. पतीकडून वेळ दिला जात नसता तिने ही बाब तिच्या सासू सासऱ्याला सांगितली. मात्र त्यांच्याकडूनही तिला टोमणे मारले होते. तिचा शारीरीक छळ केला जात होता. दीपा हिची तिचा पती महेश मोहपे यांनी तिची गळा दाबून हत्या केली. ही हत्या नसून ती आत्महत्या आहे. हे भासविले. मृत महिलेच्या आईने या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तिची मुलगी दिपा हिने आत्महत्या केली सून तिची हत्या करण्यात आल्याचा ठाम संशय व्यक्त केला. पोलिसांनी तपास केला. तिचा पती महेश मोहपे याला पोलिसांनी पत्नीची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास टिटवाळा पोलिस करीत आहेत.

Web Title: husband arrested in case of strangulation of wife