सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 06:35 IST2025-09-14T06:34:40+5:302025-09-14T06:35:15+5:30
सर्व्हर डाऊन झाल्याने १७८ परीक्षार्थीना परीक्षा देता आली नाही. जवळपास तीन तास या केंद्रावर गोंधळाची परिस्थिती उद्भवली होती. परीक्षा पुन्हा घेतली जाईल असे सांगितले.

सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
कल्याण : कल्याण शीळ रोडलगत असलेल्या सुरेखा इन्फोटेक या केंद्रावर शुक्रवारी स्टाफ सिलेक्शन कमिशनची न परीक्षा देण्यासाठी मोठ्या संख्येने परीक्षार्थी आले असताना दुपारच्या सत्रात या केंद्रावरील सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षार्थीना परीक्षा देता आली नाही. त्यांना पुन्हा परीक्षेची संधी मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सगळ्याचा मनस्ताप ■ो परीक्षार्थीना सहन करावा लागला. संतापलेल्या परीक्षार्थीना रोखण्याकरिता अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले.
सर्व्हर डाऊन झाल्याने १७८ परीक्षार्थीना परीक्षा देता आली नाही. जवळपास तीन तास या केंद्रावर गोंधळाची परिस्थिती उद्भवली होती. परीक्षा पुन्हा घेतली जाईल असे सांगितले. ती कधी घेतली जाईल याविषयी सुस्पष्टता नाही. या परीक्षेसाठी देशातील अनेक राज्यांतून परीक्षार्थी आले होते. शनिवारीही या केंद्रावर स्टाफ सिलेक्शनची परीक्षा होती.
परीक्षार्थीच्या केंद्रावर रांगा
सकाळ आणि दुपारच्या सत्रातील परीक्षा पार पडली. मात्र, सायंकाळच्या सत्राकरिता केंद्रावर परिक्षार्थीच्या रांगा होत्या.
ही महत्त्वाची परीक्षा होणार की नाही याची धाकधूक अनेक उमेदवारांत होती. शनिवारी सर्व्हर सुरू असल्याचे सुरेखा इन्फोटेकच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
'त्या' विद्यार्थ्यांना हवी पुन्हा संधी
कल्याण-डोबिवली महापालिकेच्या ४९० पदांसाठी ९ ते १२ सप्टेंबर दरम्यान राज्यातील १४ जिल्ह्यांत २५ केंद्रांवर परीक्षा आयोजित केली होती. ९ सप्टेंबरला काही परिक्षार्थीकरिता मुंबईतील पवई येथे परीक्षा केंद्र देण्यात आले होते.
जवळपास १५० पेक्षा जास्त परीक्षार्थी वाहतूक २ कोंडीमुळे परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचू शकले नाही. काही विद्यार्थी केवळ एका सेकंदासाठी उशिरा पोहोचले तरी त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला गेला नाही.
त्यामुळे १५० पेक्षा जास्त परीक्षार्थीची परीक्षा हुकली. त्यांनी परीक्षा देण्याची पुन्हा एक संथी द्यावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली. या संदर्भात महापालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही. हे परीक्षार्थी दररोज महापालिका मुख्यालयासमोर येऊन उभे राहतात.