घरात पावसाचे पाणी साचले; संतप्त नागरिकासह माजी नगरसेवकाचे पाण्यातच ठिय्या आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 06:54 PM2021-07-21T18:54:31+5:302021-07-21T18:54:47+5:30

आडीवली ढोकली परिसरात पावसाचे पाणी नागरीकांच्या घरात शिरले आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले असले तरी प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.

The house was flooded with rainwater; Former corporator's sit-in agitation with angry citizens | घरात पावसाचे पाणी साचले; संतप्त नागरिकासह माजी नगरसेवकाचे पाण्यातच ठिय्या आंदोलन 

घरात पावसाचे पाणी साचले; संतप्त नागरिकासह माजी नगरसेवकाचे पाण्यातच ठिय्या आंदोलन 

googlenewsNext

कल्याण-गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे कल्याण पूर्व भागातील आडीवली ढोकली परिसरातील नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी साचले आहे. तसेच रस्ते देखील जलमय झाले आहे. याकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ स्थानिक माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी संतप्त नागरीकांसह साचलेल्या पाण्यात ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या निषेधार्थ नागरीकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

    आडीवली ढोकली परिसरात पावसाचे पाणी नागरीकांच्या घरात शिरले आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले असले तरी प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. पावसामुळे या परिसरातील रस्ते खराब झाले आहे. खराब झालेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहे. या खड्डेमय रस्त्यातून मार्गक्रमण करताना नागरीकांना अपघाताचा सामना करावा लागतो आहे. प्रशासनाने केलेल्या ठिय्या आंदोलनाची दखल घेत नाही तर यापूढे कल्याण शिळ रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा इशारा नगरसेवक पाटील यांनी दिला आहे. 

    या परिसरात राहणा:या एका संतप्त गृहिणीने तिची व्यथा माडंली की, तिच्या घरात तीन दिवसापासून पावसाचे पाणी शिरले आहे. घरातील टीव्ही, फ्रीज आणि अन्य इलेक्ट्रीकल्स साधने खराब झाली आहे. गटारीचे संडासाचे पाणी तिच्या घरात आहे. घरात राहयचे कसे. तिचे पती पॅरालाईसेसने आजारी आहेत. पाणी साचलेल्या खराब रस्त्यातून घरार्पयत रिक्षा येत नाही. तिची सून गरोदर आहे. आम्ही जायचे कुठे आणि राहायचे कुठे असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. 

    अन्य एका महिने सांगितले की, कर्ज काढून अंगावरील दागिने विकून आम्ही या ठिकाणी घरे घेतली आहे. आत्ता आम्ही विष खाऊन मरायचे. केवळ कोरोनाचे कारण देत महापालिका काहीच पावले उचलत नाही. केडीएमसीने काहीच उपाययोजना केल्या नाही तर आम्ही आत्महदन करु असा इशारा प्रशासनाला दिला आहे.

Web Title: The house was flooded with rainwater; Former corporator's sit-in agitation with angry citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.