डोंबिवली: वीजा चमकून पावसाची जोरदार हजेरी; इंटरनेट सेवा ठेवली बंद 

By अनिकेत घमंडी | Updated: September 8, 2022 18:11 IST2022-09-08T18:08:38+5:302022-09-08T18:11:45+5:30

नागरिकांची आडोसा घेण्यासाठी धावपळ झाली.

heavy rain with lightning flashes in dombivli internet service kept off | डोंबिवली: वीजा चमकून पावसाची जोरदार हजेरी; इंटरनेट सेवा ठेवली बंद 

डोंबिवली: वीजा चमकून पावसाची जोरदार हजेरी; इंटरनेट सेवा ठेवली बंद 

डोंबिवली: बुधवारप्रमाणेच गुरुवारी संध्याकाळी 5।15च्या सुमारास जोरदार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. ढगांचा गडगडाट आणि विजा चमकल्याने रस्तावरील नागरिकांची धावपळ झाली. 

नागरिकांची आडोसा घेण्यासाठी धावपळ झाली. पावसाची जोरदार सर आल्याने व्यावसायिक, फेरीवाले आदींची पंचाईत झाली.  दिवसभर ऊन पडले होते, सायंकाळी 5 वाजता काही वेळातच आकाशात काळे ढग आले असून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. शाळेतून घरी येणाऱ्या विद्यार्थ्यांची या अचानक आलेल्या पावसामुळे पंचाईत झाली, 
गुरुवारच्या पावसाचा जोर जास्त होता.

वीजा चमकायला लागल्याने शहरातील इंटरनेट सेवा देणाऱ्या  खासगी व्यावसायिकांनी सर्वरच्या सुरक्षेच्या कारणाने सेवा काही वेळ बंद केली, त्याबाबत त्यांनी ग्राहकांना सूचित केले आणि सेवा सुरळीत कधी होईल याबाबतचे संदेश पाठवून जनजागृती केली.
 

Web Title: heavy rain with lightning flashes in dombivli internet service kept off