शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाच वेळा त्याने मारलाय लोकांच्या हातांवर फटका, नाशिकच्या शेतकऱ्याला गमवावा लागला पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:36 IST

तपोवन एक्स्प्रेसमधून प्रवास करणारा गौरव निकम हा रविवारी अशाच हल्ल्यामुळे रेल्वेतून पडला व त्याला पाय गमवावा लागला.  

कल्याण : धावत्या मेल, एक्स्प्रेसमध्ये दरवाजात उभ्या प्रवाशाच्या हातावर फटका मारून लूटमार करणाऱ्या अल्पवयीन इराणी मुलाला कल्याण रेल्वे पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. धक्कादायक म्हणजे या मुलावर याआधी पाच गुन्हे दाखल आहेत. अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत मुलगा बालसुधारगृहात जातो व तेथून बाहेर पडताच पुन्हा फटका गँगमध्ये सहभागी हाेत असे. सज्ञान समजून त्याच्या विरोधात खटला चालविण्यात यावा, अशी मागणी न्यायालयात करणार असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली. तपोवन एक्स्प्रेसमधून प्रवास करणारा गौरव निकम हा रविवारी अशाच हल्ल्यामुळे रेल्वेतून पडला व त्याला पाय गमवावा लागला.  

कल्याण-आंबिवली रेल्वे ट्रॅकला लागून आंबिवली येथे इराणी वस्ती आहे. या रेल्वे ट्रॅकवर फटका गँग सक्रिय आहे. आंबिवली स्टेशन येण्याच्या आधी एका ठिकाणी रुळाला वळण आहे. गाडीची गती कमी हाेताच  चोराने दरवाजात उभ्या असलेल्या गौरवच्या हातावर फटका मारला. फटका बसताच गौरव खाली पडले आणि त्यांचा पाय गाडीखाली कापला गेला. या प्रकरणी सराईत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. 

ड्रग्ज, चाेरांचा अड्डा असलेली इराणी वस्तीकल्याणनजीक असलेली इराणी वस्ती चोरट्यांच्या वास्तव्यामुळे बदनाम आहे. देशभरातील चोरटे या वस्तीत राहतात. इराणी नावाला आधी चष्मे विकायचे. मात्र, तो त्यांचा दाखविण्याचा धंदा होता. खरा धंदा लुटीचा असायचा. ५० वर्षांपूर्वी हे इराणी बलुचिस्तान येथून भारतात आले. त्यातील काहींनी आंबिवली येथे बस्तान बसवले. 

वस्तीत पोलिसांनी अनेक वेळा कोम्बिंग ऑपरेशन केले. ज्यावेळी पोलिस इराणी वस्तीत चोरट्यांना पकडण्यासाठी जातात त्यावेळी इराणी महिला-पुरुष पोलिसांवर प्राणघातक हल्ले करतात. 

२००८ साली या वस्तीला लागून असलेल्या रेल्वे फाटकावर इराणी चोरांना पकडून नेताना पोलिसांवर प्राणघातक  हल्ला झाला होता. त्यावेळी पोलिसांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी चेन्नई पोलिसांच्या चकमकीत एक इराणी चोरटा मारला गेला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसpassengerप्रवासी