शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

रोज दहा जणांकडे जाऊन चहा प्यायचाच!  बावनकुळे यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:25 IST

डोंबिवलीत मंगल कलश यात्रा आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेताना केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: मे २०२४ मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीत भाजपला महाविजय मिळवून देण्यासाठी पक्षाने तुमची वॉरियर्स, कमांडर म्हणून तुमची नियुक्ती केली आहे. भाजपच्या वॉरियर्सनी रोज १० जणांकडे जाऊन चहा प्यायचाच, असा कानमंत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे कार्यकर्त्यांना दिला. बावनकुळे रविवारी डोंबिवलीत मंगल कलश यात्रा आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते.

जो पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’ ऐकणार नाही, पक्षाचे सरल ॲप डाऊनलोड करून रोज अपडेट राहात नाही त्या सगळ्यांची नोंद पक्ष घेत असून पक्षाने ठरविले तर अशा वॉरियर्सना पालिका असो किंवा अन्य निवडणुकांमध्ये पक्षाचा एबी फॉर्म मिळणार नाही, अशी स्पष्ट शब्दांत तंबीच त्यांनी बंद दरवाजाआड झालेल्या बैठकीत दिली.

१५० जणांचा ग्रुप करा

  प्रत्येक वॉरियर्सने त्यांच्या तीन बुथवर जाऊन प्रत्येक बुथवर सुमारे १५० जणांचा ग्रुप तयार करायचा आहे, त्यामधून ६ व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करायचे आणि त्याद्वारे ९०० नागरिकांना जोडायचे, असेही त्यांनी सूचित केले.   मन की बात बुथवर १५० जणांना सोबत घेऊन एकत्र येऊनच  ऐकायची, त्यासाठी सुमारे दोन हजार रुपये चहासाठी खर्च करावा.   खर्च करणे जमणार नसेल तर पक्षाला कळवावे जेणेकरून व्यवस्था करण्यात येईल, असा टोला लगावताच सभागृहात हशा पिकला.

पुढील १५ वर्षे भाजपचाच मुख्यमंत्री

पुढील १५ वर्षे राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री राहील यासाठी सगळ्यांनी भरपूर काम करावे. पक्षाला आणखी चांगले दिवस येणार असून त्यात तुम्ही २०२४ च्या महाविजयसाठी जोरदार काम करावे. तुमचेही चांगले दिवस येतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा