कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा; २५ जानेवारीला नवा पत्रीपूल वाहतुकीसाठी होणार खुला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 05:13 PM2021-01-22T17:13:09+5:302021-01-22T17:14:20+5:30

पूलाचे काम रखडल्याने त्यावर अनेकांनी गाणीही तयार केली होती. तसेच विरोधकांनी पूलाच्या दिरंगाईमुळे शिवसेनेला लक्ष्य केले होते.

Great relief to the people of Kalyan-Dombivali; The new bridge will be open for traffic January 25 | कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा; २५ जानेवारीला नवा पत्रीपूल वाहतुकीसाठी होणार खुला

कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा दिलासा; २५ जानेवारीला नवा पत्रीपूल वाहतुकीसाठी होणार खुला

googlenewsNext
ठळक मुद्देहा पूल वाहतूकीसाठी खुला केल्यावर पूलाच्या दिरंगामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडी दूर होण्यास मोठी मदत होणारऑगस्ट २०१८ मध्ये हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर मोठी यंत्रणा लावून नोव्हेंबर २०१८ मध्ये पूलाचे पाडकाम करण्यात आलेपत्री पूलाच्या जागी नव्याने उभारताना ७०० मेट्रीक टन वजनाचा गर्डर तयार करण्यात आला.

कल्याण- कल्याण आणि डोंबिवलीला जोडणारा बहुचर्चित नवा पत्री पूल वाहतूकीसाठी २५ जानेवारी रोजी खुला केला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पूलाचे ऑनलाईन लोकार्पण केले जाणार असल्याची माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. या ऑनलाईन सोहळ्यात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार आहेत.

जुना पत्रीपूल हा ब्रिटीशकालीन होता. हा ऐतिहासिक पूल वाहतूकीसाठी धोकादायक असल्याचे रेल्वेने केलेल्या ऑडीटमध्ये उघड झाले होते. ऑगस्ट २०१८ मध्ये हा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर मोठी यंत्रणा लावून नोव्हेंबर २०१८ मध्ये पूलाचे पाडकाम करण्यात आले. त्यानंतर या पूलाच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी आल्या. पूलाच्या कामाला लॉकडाऊनचाही सामना करावा लागला. १०० वर्षे जुना असलेल्या पत्री पूलाच्या जागी नव्याने उभारताना ७०० मेट्रीक टन वजनाचा गर्डर तयार करण्यात आला. हा गर्डर हैद्राबाद येथील कारखान्यात तयार करण्यात आला. कोरोना काळात हा गर्डर आणण्यासाठी विशेष परवानगी घेण्यात आली.

अनंत अडचणीवर मात करीत पूलाचे काम मार्गी लावण्यासाठी खासदार शिंदे यांनी कंबर कसली. अखेरीच हे काम पूर्णत्वास आले आहे. या पूलाचे लोकार्पण २५ जानेवारी रोजी होऊन पूल वाहतूकीसाठी खुला केला जाणार आहे. पूलाचे काम रखडल्याने त्यावर अनेकांनी गाणीही तयार केली होती. तसेच विरोधकांनी पूलाच्या दिरंगाईमुळे शिवसेनेला लक्ष्य केले होते. आत्ता विरोधकांकडे पत्री पूलाचा मुद्दा नाही. विशेष म्हणजे कल्याण ठाकूर्ली समांतर रस्त्याचा अप्रोच रोडही अपुरा होता. मात्र २८ नोव्हेंबरपासून या रस्त्याचे काम महापालिकेने युद्ध पातळीवर हाती घेतले. अप्रोच रोडचे काही पूर्णत्वास आले आहे. हा पूल वाहतूकीसाठी खुला केल्यावर पूलाच्या दिरंगामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडी दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.

तिसऱ्या पुलाच्या कामाला लवकर सुरुवात

नव्याने तयार करण्यात आलेला भव्य पत्री पूल खुला होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेला पूल असे दोन्ही पूल मिळून कल्याण शीळ रस्त्याच्या चार लेन पूर्ण करीत आहे. मात्र भिवंडी- कल्याण- शीळ हा रस्ता सहा पदरी असून त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. तिसऱ्या लेनकरीता नव्या पत्री पूलाच्या बाजूला आणखीन एक तिसरा रेल्वे उड्डाणपूल उभारला जाणार आहे. त्याचे काम लवकर सुरु केले जाणार आहे.

Read in English

Web Title: Great relief to the people of Kalyan-Dombivali; The new bridge will be open for traffic January 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.