सरकारने कल्याण डोंबिवली शहरासाठी उल्हासनगरच्या धर्तीवर पॉलिसी आणावी - आमदार राजू पाटील
By प्रशांत माने | Updated: September 16, 2023 00:49 IST2023-09-16T00:48:34+5:302023-09-16T00:49:26+5:30
उल्हासनगरला ज्याप्रमाणे राज्य सरकारने पॉलिसी आणली, तशाच प्रकारची पॉलिसी याही शहरातील इमारतींसाठी वापरली जावी, असे मत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मांडले.

सरकारने कल्याण डोंबिवली शहरासाठी उल्हासनगरच्या धर्तीवर पॉलिसी आणावी - आमदार राजू पाटील
डोंबिवली: कल्याण आणि डोंबिवली शहरातील अशा जून्या धोकादायक इमारतीसाठी क्लस्टर व्यतिरिक्त आणखी काहीतरी योजना आणावी, शिवाय उल्हासनगरला ज्याप्रमाणे राज्य सरकारने पॉलिसी आणली, तशाच प्रकारची पॉलिसी याही शहरातील इमारतींसाठी वापरली जावी, असे मत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मांडले.
आयरे गावात आदिनारायण भुवन या तीन मजली इमारतीचा काही भाग आज कोसळून एकाचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आली तर अन्य एकाचा शोध सुरु आहे. याठिकाणी आमदार पाटील यांनी भेट दिली असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही मागणी केली. एखाद्या बिल्डरच्या माध्यमातून सोयी सुविधा देऊन नागरिकांना कशी घर मिळतील याचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचं असल्याचेही पाटील म्हणाले.