मुंबईतील शिक्षकांना ३० जानेवारीला सुट्टी द्या - अनिल बोरनारे
By अनिकेत घमंडी | Updated: January 20, 2023 15:43 IST2023-01-20T15:43:18+5:302023-01-20T15:43:47+5:30
अनिल बोरनारे यांनी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली आहे.

मुंबईतील शिक्षकांना ३० जानेवारीला सुट्टी द्या - अनिल बोरनारे
डोंबिवली : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता, यावा यासाठी मुंबईतील मतदानास पात्र शिक्षकांना ३० जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे. याबाबत अनिल बोरनारे यांनी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे ही मागणी केली आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी बोरनारे यांच्या मागणीवरून राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पत्र सादर केले आहे. ३० जानेवारी रोजी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असून निवडणूक आयोगाने ठाणे पालघर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांना सुट्टी जाहीर केली आहे . मुंबईतील शाळांमध्ये अध्यापन करणारे अनेक शिक्षक ठाणे नवी मुंबई व पालघर जिल्ह्यात वास्तव्यास असल्याने या शिक्षकांनी कोकण विभाग शिक्षक मतदार संघात नोंदणी केली आहे.
मतदार नोंदणी साठी निवासस्थान ग्राह्य धरले जाते. त्यामुळे मुंबईतील अनुदानित विना अनुदानित सेल्फ फायनान्स व अन्य शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांनी निवासस्थान कोकण मध्ये असल्याने नोंदणी केली असल्याने त्यांना नियमानुसार मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.