विद्यार्थिनींना महिला दिनी संगणक भेट; आमदार राजू पाटील यांच्याकडून अनोखा पद्धतीने महिला दिन साजरा
By मुरलीधर भवार | Updated: March 8, 2023 19:24 IST2023-03-08T19:24:11+5:302023-03-08T19:24:21+5:30
आमदार मानधन महिला दिनी विद्यार्थिनींसाठी

विद्यार्थिनींना महिला दिनी संगणक भेट; आमदार राजू पाटील यांच्याकडून अनोखा पद्धतीने महिला दिन साजरा
कल्याण- मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आज महिला दिनाचे औचित्य साधून आपल्या आमदारकीच्या मानधनामधून डोंबिवली मधील स.वा.जोशी या महिला महाविद्यालयास ३ संगणक आणि एक प्रिंटर भेट दिला आहे. महाविद्यालयास महिला दिनी मनसे आमदार पाटील यांनी संगणक उपलब्ध करून दिल्याने महिला विद्यार्थिनीं आमदार पाटील यांचे आभार मानले आहेत.
डोंबिवली मधील स.वा. जोशी या महाविद्यालयाला संगणक आणि प्रिंटरची आवश्यकता असल्याची माहिती आमदार पाटील यांना दिली होती. महाविद्यालयास तीन संगणक आणि एक प्रिंटर भेट दिला आहे. आज महिला दिनी या संगणक कक्षाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मनसेच्या उपाध्यक्षा दिपाली पेडणेकर, डोंबिवली शहर अध्यक्षा मंदाताई पाटील, शहर सचिव कोमल पाटील, ऍड.तृप्ती पाटील यांसह अनेक महिला पदाधीकारी शिक्षक आणि विद्यार्थी हजर होते.