माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडून वनवासी भगिनींना साडी व मिठाईचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 17:17 IST2021-11-05T17:16:19+5:302021-11-05T17:17:00+5:30

दीपावली भाऊबीज निमित्त वनवासी भगिनींशी नरेंद्र पवारांनी साधला संवाद

former MLA Narendra Pawar distributes sarees and sweets to Vanvasi sisters | माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडून वनवासी भगिनींना साडी व मिठाईचे वाटप

माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडून वनवासी भगिनींना साडी व मिठाईचे वाटप

कल्याण- दिवाळीनिमित्त आमदार नरेंद्र पवार यांच्या वतीने आयोजित केलेल्या वनवासी भगिनींना साडी व मिठाईचे वाटप आज करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आत्माराम (बाबा) जोशी यांनी १५ वर्षांपासून सुरू केलेल्या या उपक्रमात धसई, मुरबाड  जवळील वनवासी पाड्यात दरवर्षी साडी व मिठाई भेट देण्यात येतात.  

दरवर्षीप्रमाणे भाऊबीजेनिमित्त १ साडी व मिठाईचा पुडा देण्याचा उपक्रम याही वर्षी वनवासी संवाद ने आयोजित केला होता. वीस गावातील जवळपास १७००  भगिनी याचा लाभ घेणार असून त्यांच्या कुटुंबियांशी संवाद केला जाणार आहे. त्यापैकी कल्याण पश्चिममधील आधारवाडीतील वनवासी बांधव वस्ती व बिर्ला कॉलेज वनवासी वस्ती येथील महिलांना माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वतीने साड्या व फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच कल्याण शहरामध्ये वनवासी बंधू भगिनींचा जो विकास होणे अपेक्षित आहे तो विकास आता पर्यंत झाला नाही आहे. त्या कडे प्रामुख्याने जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार, निश्चय नरेंद्र पवार व बुधाराम सरनोबत यांनी असा संकल्प केला . विविध योजना केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या या बांधवान पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी केले 

यावेळी वनवासी संवादचे प्रमुख श्री.आत्माराम(बाबा) जोशी, माजी उपमहापौर तथा कल्याण जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चा श्री. बुधाराम सरनोबत,सौ.नीरजा मिश्रा, अनुसूचित जाती जमाती कल्याण शहर अध्यक्ष श्री.सागर भालेराव, सेवा प्रमुख चंद्रगुप्त नगर श्री.सुनील श्रीवास्तव,श्री. तानाजी गायकर, श्री.मिलिंद शेलार, श्री. बंटी फर्नांडिस, श्री. राहुल देठे, श्री. मंगेश खातू,श्री. विनोद कुलकर्णी, श्री.आत्माराम फड सर,श्री.समर बहदूर मोरया, श्री. जितेंद्र देशपांडे, श्री.योगेश बोडक, श्री. अप्पा म्हात्रे,श्री.पंकज तिवारी, श्री. राकेश सिंग हे स्वयंसेवक तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: former MLA Narendra Pawar distributes sarees and sweets to Vanvasi sisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.