प्ले झोनमध्ये खेळताना पडल्याने पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, डोंबिवलीमधील हृदयद्रावक घटना
By प्रशांत माने | Updated: November 1, 2023 15:51 IST2023-11-01T15:50:15+5:302023-11-01T15:51:32+5:30
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतेय.

प्ले झोनमध्ये खेळताना पडल्याने पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, डोंबिवलीमधील हृदयद्रावक घटना
डोंबिवली: येथील पुर्वेकडील मानपाडा परिसरातील रिजन्सी अनंतंम या गृहसंकुलात प्ले झोन मध्ये खेळत असताना पडल्याने एका पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सक्षम उंडे असे या मुलाचं नाव असून या घटनेची नोंद मानपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतेय.
रिजन्सी अनंतंम या हायप्रोफाईल गृहसंकुलात भरत उंडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांचा मुलगा सक्षम हा सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कॉम्प्लेक्सच्या क्लब हाऊस मधील प्लेझोन मध्ये खेळण्यासाठी गेला होता. खेळत असताना तो अचानक खाली पडला. हा प्रकार तेथील कामगारांच्या निदर्शनास पडतात. त्यांनी सक्षमला तत्काळ नजीकच्या खाजगी रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सक्षम हा एकुलता एक मुलगा होता. तो खेळताना खाली पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची नोंद करीत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.