शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 11:46 IST

पुनर्विकासात अनियमितता : न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई

ठळक मुद्देजेथे माणिक कॉलनी वसाहत होती, त्या प्रभागातील तक्रारदार गीध हे माजी नगरसेवक आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : पश्चिमेकडील केडीएमसी मुख्यालयाच्या नजीक असलेल्या माणिक कॉलनी वसाहतीच्या पुनर्विकासात अनियमितता आणि फसवणूक झाल्याच्या तक्रारीनुसार बाजारपेठ पोलीस ठाण्यात केडीएमसीच्या पाच आयुक्तांसह सहाय्यक संचालक नगररचनाकार, बिल्डर आणि वास्तूविशारद अशा १८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. माजी नगरसेवक अरुण गीध यांनी याप्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जेथे माणिक कॉलनी वसाहत होती, त्या प्रभागातील तक्रारदार गीध हे माजी नगरसेवक आहेत. या वसाहतीचा पुनर्विकास करताना येथील १३७ कुटुंबांना त्यांच्या मालकी हक्काची चांगली घरे मिळावीत, या उद्देशातून गीध हे पाठपुरावा करत होते. परंतु, वसाहतीच्या ठिकाणी पुनर्विकास सुरू झाल्यानंतर विकासकाने रहिवाशांना त्यांना दिलेल्या क्षेत्रफळाप्रमाणे घरे दिली नाहीत. एफएसआयचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला. विकास नियंत्रण नियमावलीचा भंग करून बांधकाम परवानगी देण्यात आली. जानेवारी २००४ पासून तत्कालीन आयुक्त, नगररचना अधिकारी यांना हाताशी धरून त्यांच्याशी संगनमत करून विकासकाने अनियमितता आणि फसवणूक केल्याचा आरोप गीध यांचा आहे. कॉलनीचा विकास करताना पार्किंग, मार्जिन स्पेस तसेच आवश्यक सुविधा देणे गरजेचे होते. याउलट पार्किंगच्या ठिकाणी व्यावसायिक गाळे काढले असून, पार्किंगसाठी जागा ठेवलेली नाही, याकडेही गीध यांनी लक्ष वेधले आहे. 

याप्रकरणी महापालिका आयुक्त, पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या. पण कोणीही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे गीध यांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. त्यांच्यावतीने ॲड. अक्षय कापडिया यांनी युक्तिवाद करताना बांधकाम पुनर्विकासात अनियमितता झाल्याचे मत मांडले. या प्रकरणात काही गैरप्रकार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे मत नोंदवित सहभागी विकासक, वास्तुविशारद, तत्कालीन आयुक्त, सहाय्यक संचालक नगररचना आणि नगररचनाकार अशा एकूण १८ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यावर गुरुवारी रात्री उशिरा बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पुढील तपास सुरू आहे. माणिक कॉलनी वसाहतीच्या जागेवर २३ मजली संकुल उभे आहे.

 याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास केला जाईल, अशी प्रतिक्रिया बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी दिली. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस