कल्याण डोंबिवलीमध्ये पहिली राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न

By सचिन सागरे | Updated: July 8, 2024 14:26 IST2024-07-08T14:24:32+5:302024-07-08T14:26:59+5:30

११, १३, १५, १७ आणि १९ वर्षांखालील व स्त्रीपुरूष या सर्व गटांमधील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

First state level table tennis tournament concluded in Kalyan Dombivli | कल्याण डोंबिवलीमध्ये पहिली राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न

कल्याण डोंबिवलीमध्ये पहिली राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा संपन्न

डोंबिवली : एमएसटीटीएस व टीडीटीटीएने मंजुर केलेली पहिली राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा येथील सावळाराम क्रीडा संकुल येथे ३ ते ७ जुलै या काळात संपन्न झाली. या स्पर्धेस महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तब्बल ९५६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेचे आयोजन डायनॅमिक स्पोर्ट्स यांनी कल्याण महिला मंडळाच्या सहयोगाने केले होते. इतक्या प्रचंड संख्येने खेळाडुंचा स्पर्धेतील सहभाग कोविडनंतर पहिल्यांदाच असल्याचे एमएसटीटीएसचे पदाधिकारी व टीडीटीटीएचे सचिव यतिन टिपणीस यांनी सांगितले.

११, १३, १५, १७ आणि १९ वर्षांखालील व स्त्रीपुरूष या सर्व गटांमधील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अत्यंत रंगतदार झालेल्या या स्पर्धांमध्ये खेळाडूंचा कस लागत होता. विजेत्यांनी अत्युच्च दर्जाचा खेळ करत अंतिम विजय मिळवला. या विजेत्यांना राष्ट्रीय स्पर्धेत खेळायची संधी लवकर मिळावी या उद्देशाने ही स्पर्धा भरविल्याचे आयोजकांनी सांगितले.अनेकांच्या सहकार्याने व सहभागाने ही स्पर्धा यशस्वी संपन्न झाल्याचे आयोजकांनी सांगितले

Web Title: First state level table tennis tournament concluded in Kalyan Dombivli