कल्याणच्या मोहने परिसरात गोळीबार; तरुणाच्या तोंडात अडकली गोळी
By मुरलीधर भवार | Updated: October 4, 2023 21:36 IST2023-10-04T21:35:30+5:302023-10-04T21:36:42+5:30
या प्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.

कल्याणच्या मोहने परिसरात गोळीबार; तरुणाच्या तोंडात अडकली गोळी
मुरलीधर भवार-कल्याण: कल्याण- कल्याणनजीकच्या मोहने परिसरात गोळीबाराची घटना समोर आली आहे. मोहने परिसरात सुशील महंतो आणि त्याचे चार ते पाच मित्र एकत्र बसले होते. त्याच वेळी एका मित्राने त्याच्याकडील बंदुकीतून सुशीलवर गोळी झाडली .यावेळी सुशीलने हात आडवा केल्याने त्याच्या हाताचा पंजा फाडून ही गोळी त्याच्यात तोंडात गेली.
मात्र यात त्याची जीभ देखील फाडली गेली. सध्या सुशीलच्या घशामध्ये ही गोळी अडकली आहे. सुशीलला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र मित्रांनीच मित्रावर गोळी झाडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.