अंबरनाथमध्ये रेल्वेच्या इलेक्ट्रिक केबिनला आग, कर्जत दिशेकडील रेल्वे वाहतूक अर्धा तास ठप्प

By पंकज पाटील | Updated: May 6, 2023 17:40 IST2023-05-06T17:39:59+5:302023-05-06T17:40:51+5:30

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

Fire in the electric cabin of the railway in Ambernath, train traffic in Karjat direction stopped for half an hour | अंबरनाथमध्ये रेल्वेच्या इलेक्ट्रिक केबिनला आग, कर्जत दिशेकडील रेल्वे वाहतूक अर्धा तास ठप्प

अंबरनाथमध्ये रेल्वेच्या इलेक्ट्रिक केबिनला आग, कर्जत दिशेकडील रेल्वे वाहतूक अर्धा तास ठप्प

पंकज पाटील, अंबरनाथ : अंबरनाथरेल्वे स्थानकात इलेक्ट्रिकच्या केबिनला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे कर्जतकडे जाणारा रेल्वे मार्ग अर्धा तास पूर्णपणे बंद झाला.

रेल्वे स्थानकात कर्जत दिशेला रेल्वे रुळाच्या बाजूलाच रेल्वेची इलेक्ट्रिक साहित्य ठेवण्याची केबिन होती. या केबिनमध्ये असलेल्या वायर्सला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निघू लागले. त्यामुळे कर्जतकडे जाणारे रेल्वे मार्ग बंद करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र यामुळे कर्जतकडे जाणाऱ्या रेल्वे मार्ग अर्धा तास बंदच होता. अंबरनाथ रेल्वे स्थानकात एक मेल एक्सप्रेस उभी करून ठेवण्यात आली होती.

Web Title: Fire in the electric cabin of the railway in Ambernath, train traffic in Karjat direction stopped for half an hour