डोंबिवलीत आगडोंब! सीएनजी पंप थोडक्यात वाचला; परफ्युम कंपनी जळून खाक
By अनिकेत घमंडी | Updated: March 9, 2023 10:34 IST2023-03-09T10:33:58+5:302023-03-09T10:34:43+5:30
बंब वेळेत पोहोचू न शकल्याने आग वाढल्याचा आरोप कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी केली आहे.

डोंबिवलीत आगडोंब! सीएनजी पंप थोडक्यात वाचला; परफ्युम कंपनी जळून खाक
डोंबिवली : एमआयडीसीमधील रॉमसन्स या परफ्युम बनवणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागली होती. यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे.
मुकेश पांडे असे मालकाचे नाव असल्याचे समजत असून बाजूला असलेल्या राज प्राज डाइंग कंपनीपर्यंत देखील ही आग पसरली होती. त्याचबरोबर बाजूला असलेला सीएनजीचा पंपालाही आगीचा धोका होता. परंतू ही आग आटोक्यात आणण्यास फायर ब्रिगेडला यश आले आहे.
बंब वेळेत पोहोचू न शकल्याने आग वाढल्याचा आरोप कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी केली आहे. 10 बंब लावून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.