अखेर त्या राजकीय कमानी हटवल्या! लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 17:27 IST2023-11-30T17:26:22+5:302023-11-30T17:27:26+5:30

29 नोव्हेंबर रोजी सुद्धा लोकमत ने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर 30 नोव्हेंबर रोजी  केडीएमसीने अखेर या कमानी हटवल्या आहेत.

Finally removed those political arches! Impact of news published in Lokmat news | अखेर त्या राजकीय कमानी हटवल्या! लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट

अखेर त्या राजकीय कमानी हटवल्या! लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट

डोंबिवली (मयुरी चव्हाण काकडे) -डोंबिवली शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सण उत्सवानिमित्त राजकीय कमानी उभारण्यात आल्या होत्या. या कमानी जेव्हा उभ्या केल्या जात होत्या तेव्हाच लोकमतने या कमानीमुळे सामान्य नागरिकांना कशाप्रकारे त्रास होतो याकडे विशेष लक्ष वेधले होते. 29 नोव्हेंबर रोजी सुद्धा लोकमत ने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर 30 नोव्हेंबर रोजी  केडीएमसीने अखेर या कमानी हटवल्या आहेत.

दहीहंडी, गणपती, नवरात्र आणि दिवाळी हे सर्व सण संपले तरी राजकीय कमानी या थाटात रस्त्यात उभ्या होत्या. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत होती आणि या कमानीमुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता सुद्धा वर्तविण्यात येत होती. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन आता तरी जागे होईल का ? असा सवाल उपस्थित केला गेला? अखेर या कमानी  हटवण्यात आल्या असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.

Web Title: Finally removed those political arches! Impact of news published in Lokmat news