भररस्त्यात २ कबड्डीपट्टूंमध्ये हाणामारी, व्हिडीओ व्हायरल; पोलिसांनी केली मध्यस्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 14:31 IST2021-10-16T14:31:08+5:302021-10-16T14:31:23+5:30
शंकरराव चौक परिसरात भर रस्त्यात राडा झाला .एका खेळाडूला संघातून बाहेर काढण्यावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

भररस्त्यात २ कबड्डीपट्टूंमध्ये हाणामारी, व्हिडीओ व्हायरल; पोलिसांनी केली मध्यस्थी
कल्याण - कल्याणमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर खुलेआम राडेबाजी होण्याचे प्रकार वाढत आहे. आता पुन्हा एकदा कल्याणमध्ये भर रस्त्यात हाणामारी झाली असल्याचे समोर आलं आहे. कबड्डीपट्टूमध्ये ही मारामारी झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
शंकरराव चौक परिसरात भर रस्त्यात राडा झाला .एका खेळाडूला संघातून बाहेर काढण्यावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन नामांकित खेळाडूंचाही यामध्ये समावेश आहे. या हाणामारीचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. याप्रकरणाचा तपास बाजारपेठ पोलीस करत होते. दोन्ही गटांना आम्ही बोलावून घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी आपआपसात समजूतीन हे प्रकरण मिटवल्याचं बाजरपेठ पोलिसांनी सांगितलं. दरम्यान कल्याण मध्ये भररस्त्यात हाणामाऱ्या होत असल्याने कायद्याचा धाक राहिला की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.