शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

डोंबिवली सांस्कृतिक नगरीत गुलाबांचा उत्सव; रोझ फेस्टिवलचे चौदावे वर्ष

By अनिकेत घमंडी | Updated: February 10, 2024 16:06 IST

बलभवनमध्ये राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन

डोंबिवली: गुलाबांच्या फुलांची नजाकत काही औरच असते, त्याचे मनमोहक रुप आकर्षक रंग, ताजा टवटवीत डौलदारपणा आणि सर्वात महत्त्वाची त्याची अतुलनीय अशी रोमँटीक व्हॅल्यू अबालवृध्दांच्या मनाला नक्कीच साद घालते अशा शब्दांत बलभवन येथील १४व्या रोझ फेस्टिवल अनोख्या गुलाब पुष्प प्रदर्शनाचे कौतुक करत नागरिकांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला.

मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठ्या गुलाब पुष्प प्रदर्शनाचे यंदाही शनिवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बलभवन, रामनगर येथे शुभारंभ झाला. इंडियन रोझ फेडरेशन ह्या अखिल भारतीय गुलाबप्रेमी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील मोठमोठ्या गुलाब शेती करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना डोंबिवली रोझ फेस्टिवलमध्ये निमंत्रित करण्यात आले असून मुंबई, पुणे, वांगणी, पनवेल, शहापूर, नाशिक येथून प्रदर्शक सहभागी झाले आहेत.

डोंबिवली रोझ फेस्टिव्हलची कीर्ती गुलाब उत्पादकांमध्ये पसरली असून यंदा तर नागपूरची गुलाबपुष्पे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. डोबिवली रोझ फेस्टिवलसाठी गौरवास्पद गोष्ट म्हणजे ठाणे जिल्ह्यातील दोन प्रमुख गुलाब उत्पादक कल्याणचे राष्ट्रीय गुलाब प्रदर्शनातील पारितोषिक विजेते प्रमुख गुलाब उत्पादक वांगणीचे आशिष मोरे व चंद्रकांत मोरे तसेच सरळगावचे डॉ. विकास म्हसकर यांच्या बागेतील गुलाब हे यंदाचे खास आकर्षण आहे. येथील गुलाब उत्पादकांसोबतच महाराष्ट्रातील प्रमुख गुलाब लागवड करणाऱ्या नामांकित व्यक्ती या फेस्टिव्हलला भेट देत आहेत. दोघांनी गुलाब लागवडीत खरोखर पथदर्शक काम केलं आहे.

डॉ. म्हसकर कल्याण डोंबिवलीतील प्रख्यात प्रसृतीतज्ज्ञ असून ते सच्चे गुलाबप्रेमी आहेत. सरळगावची गुलाब बाग महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तिथे शेकडो प्रकारचे फक्त गुलाब आहेत. शेकडो डोंबिवलीकर रांग लावून शिस्तीत गुलाबांची मोहक दुनिया अनुभवायला आणि गुलाब रोपे विकत घेण्यासाठी येतात. नाशिकमधील डॉ. धनंजय गुजराथी आणि नागपूरहून मुकुंद टिजारे व प्रशांत तेलंग यांचीही गुलाबपुष्पे पहिल्यांदाच या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. उद् घाटन समारंभाला इंडियन रोझ फेडरेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष एस. धनवटे, खजिनदार अर्शद भिवंडीवाला, सचिव डॉ. विकास म्हसकर आणि रोझ क्लब नाशिकचे अध्यक्ष डॉ. धनंजय गुजराथी, ठिपसे सर, अरुण पाटील सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गेली १४ वर्षे डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल आणि सेलिब्रिटी उपस्थिती हे समीकरण जुळले आहे, हे विशेष. दर्दी गुलाबपुष्प रसिकांना हे प्रदर्शन म्हणजे पर्वणी असते त्याचबरोबर हल्ली सोशल मीडियावर पोस्ट, स्टोरी आणि रिल्ससाठी युवापिढी गर्दी करत होती. प्रदर्शन विनामूल्य असून रविवारी सकाळी १० ते १० पर्यंत खुले राहील-सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

डोंबिवलीकर हे मुख्य आयोजक असले तरीही इंडियन रोझ फेडरेशन या संस्थेतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि बॉम्बे रोझ सोसायटी आणि इनर व्हील क्लब, कल्याण यांची बहुमूल्य साथ यामुळेच दरवर्षी या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. रोजच्या धकाधकीच्या जगण्यातून वेळ काढत डोंबिवलीकर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना वर्षातील दोन दिवस स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी देता यावेत, निसर्गाच्या सान्निध्यात मनमुरादपणे आनंदाचे क्षण एन्जॉय करायची संधी मिळावी यासाठी १४ वर्षांपूर्वी एक अभिनव संकल्पना सुचली, ती म्हणजे 'डोंबिवलीकर आयोजित रोझ फेस्टिव्हल' अशी प्रतिक्रिया गुलाबप्रेमी नागरिकांनी दिली.

गुलाबांचे मनमोहक रूप, विविध रंग, ताजा टवटवीत डौलदारपणा, दरवळणारा सुगंध आणि त्याची रोमँटिक व्हॅल्यू आबालवृद्धांच्या मनाला साद घालते. वेगवेगळ्या जातींचे, रंगांचे, आकारांचे गुलाब बघताना आपला वेळ कसा निघून जातो हे कळतही नाही. अशा गुलाबांचे प्रदर्शन आणि स्पर्धा या फेस्टिव्हलच्या माध्यमातून दरवर्षी डोंबिवलीत भरते, हे वैशिष्ठ म्हणावे लागेल असेही एका महिलेने सांगितले. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली