शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

कोरोनाच्या काळात प्रवाशांकडून जादा भाडेवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 1:00 AM

कल्याण-डोंबिवली शहरात रिक्षाचालकांकडून लूट : मीटरऐवजी शेअर रिक्षाला प्रवाशांचे प्राधान्य

प्रशांत मानेकल्याण : कल्याण आरटीओच्या हद्दीत ४० हजारांहून अधिक रिक्षा असून, त्यातील निम्म्या रिक्षा कल्याण-डोंबिवली शहरांत आहेत. एकीकडे ई-मीटरने भाडे घेणे सक्तीचे केले गेले असताना दुसरीकडे प्रवाशांच्या आग्रहास्तव ९० टक्के रिक्षा येथे शेअरवर चालतात. सध्या कोरोनाचे नियम पाळून अनलॉकमध्ये रिक्षा व्यवसायाला परवानगी मिळाली आहे. मात्र, रिक्षाचालक शेअरचे भाडे जादा आकारत असून, त्यांच्या या लुटीकडे आरटीओ प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

आरटीओकडून परवान्यांची खिरापत वाटणे सुरूच असल्याने रिक्षांची संख्या वाढतच आहे.  त्यामुळे त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. लॉकडाऊनमध्ये बंद असलेला व्यवसाय व रिक्षांची संख्या वाढल्याने निर्माण झालेल्या स्पर्धेत सध्या शेअरमध्ये जादा भाडे आकारून प्रवाशांना लुटण्याचा प्रकार सुरू आहे. अनलॉकमध्ये दोन प्रवाशांना प्रवासास परवानगी आहे. मात्र, या नियमाकडे दुर्लक्ष होत आहे. पूर्वी जेथे शेअर रिक्षासाठी १० रुपये भाडे आकारले जात होते, तेथे आता २० रुपये घेतले जात आहेत.

स्थानकापासून शेअरचे प्रतिव्यक्ती भाडेआयरेगाव     २०जयहिंद कॉलनी      २०कल्याण-डोंबिवली  ५०पेंढरकर महाविद्यालय   ३०गरीबाचावाडा     २०

आरटीओने लक्ष घालावे

एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असताना रिक्षाचालकांकडून नियमांची होणारी ऐशीतैशी आणि जादा भाडे आकारणीकडे आरटीओने लक्ष द्यावे.        -  चैत्राली कदम, प्रवासी, डोंबिवली पूर्व

बसला विळखाएकीकडे जादा भाडे आकारून लूट चालवली असताना दुसरीकडे एसटी किंवा केडीएमटी उपक्रमाच्या बसला विळखा घालून तेथील प्रवासी मिळविण्याचा प्रयत्न रिक्षाचालकांकडून होत असल्याचे चित्र डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात दिसून येते.

 कोरोनाच्या काळात कोणी नियम पाळत नसेल तसेच जादा भाडे आकारत असेल, तर त्याबाबतच्या दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या वैयक्तिक तक्रारींवर कारवाई केली जात आहे.          तानाजी चव्हाण, आरटीओ अधिकारी, कल्याण

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली