कल्याणमधील गोविंद वाडी परिसरातील नवरात्र उत्सवाची सर्वत्र चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 18:52 IST2021-10-13T18:51:56+5:302021-10-13T18:52:10+5:30
सर्व किन्नर समाजातील सहकारी या उत्सवासाठी एकत्र येतात.

कल्याणमधील गोविंद वाडी परिसरातील नवरात्र उत्सवाची सर्वत्र चर्चा
कल्याण- सांस्कृतिक नगरी डोंबिवली आणि ऐतिहासिक कल्याण शहरात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जात आहे. मात्र कल्याणमधील गोविंद वाडी परिसरातील एका नवरात्र उत्सवाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नवरात्रीनिमित्त दुर्गामातेची स्थापना करून देवीची आराधना केली जाते. गोविंदवाडी परिसरातही गेल्या 14 वर्षांपासून किन्नर समाज नवरात्र उत्सव साजरा करत आहे.
जिल्ह्यातील सर्व किन्नर समाजातील सहकारी या उत्सवासाठी एकत्र येतात. मोठ्या उत्साहाने व आनंदाने व भक्तीभावाने सर्व देवीची आराधना करतात . कोरोनाच्या संकटामुळे समाजातील सर्व सहकारी येऊ शकत नसल्यानं गुरू शालिनी या काहीशा भावुक झाल्या आहेत.
यंदाही दुर्गामातेची स्थापना केली असली तरी छोटेखानी स्वरूपात हा उत्सव साजरा केला जात आहे. कोरोनाचे संकट लवकर दूर होवो म्हणजे पुढील वर्षी सर्वांनाच नवरात्र धुमधडाक्यात साजरी करता येईल आणि सर्वांना पूर्वीप्रमाणे मनमोकळे आयुष्य जगता येईल अस साकडं या समाजानं देवीकडे घातलं आहे.