- सदानंद नाईक उल्हासनगर : टाऊन हॉल मध्ये झालेल्या. भाजपा कार्यकारणी बैठकीत येणाऱ्या निवडणुकीत कलानी व चौधरी यांचा गुंडाराज संपवून टाकण्याचा इशारा उल्हासनगर निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंदानी यांनी दिला. यावेळी आमदार कुमार आयलानी, सुलभा गायकवाड यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.
उल्हासनगर कॅम्प नं-३, टाऊन हॉल मध्ये भाजपा कार्यकारणीची बैठक सोमवारी सायंकाळी पार पडली. बैठकीला आमदार कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याकडून दोन दिवसापूर्वी महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांचे नाव घेऊन भाजपाचे मनोहर बहेनवाल यांच्या कार्यकर्त्यांला मारहाण झाली. हा मारहाणीचा धागा पकडून शहरातून कलानी व चौधरी यांचा गुंडाराज येणाऱ्या निवडणुकीत संपवून टाकणार असल्याचे वक्तव्य उल्हासनगर निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंदानी यांनी केला. तेंव्हा एकच जलोष टाऊन हॉल मध्ये झाला. रामचंदानी यांच्या वक्तव्याने शहरातील गुंडाराजला उजाडा मिळाल्याचे बोलले जाते.
शहरातील पक्ष प्रवेशावरून भाजप व शिंदेसेनेत तणाव निर्माण झाला असून रविवारी शहाड उड्डाण पुलाच्या उदघाटनाचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही पक्ष पदाधिकाऱ्याकडून उदघाटन करण्यात आले. शिंदेसेनेतुन भाजपात प्रवेश घेतलेल्या माजी नगरसेविका शुभांगी बहेनवाल यांच्या एका रिक्षा चालक कार्यकर्त्यांला शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या जाधव नावाच्या कार्यकर्त्याने चौधरी यांचे नाव घेऊन मारहाण केली. त्याच दिवसी शिंदेसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी रात्री बहेनवाल यांच्या घरा समोर धुडगूस घातला. याप्रकरणी चौधरी यांच्या ८ पेक्षा जास्त कार्यकर्त्यावर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चौधरी यांचे नाव घेऊन मारहाण केल्या प्रकरणी भाजपाने शहरांत गुंडाराज येण्याची शक्यता व्यक्त केली होती. कार्यकर्त्यासह बहेनवाल दाम्पत्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्यावर, शिंदेसेना व बहेनवाल कार्यकर्ते यांच्यात हाणामारी होऊन राजकीय वातावरण तापले आहे.
Web Summary : BJP's Ramchandani pledged to eradicate Kalani and Choudhary's 'goonda raj' in Ulhasnagar during upcoming elections, following clashes between BJP and Shinde Sena workers. Tensions escalated after an assault on a BJP worker.
Web Summary : भाजपा के रामचंदानी ने आगामी चुनावों में उल्हासनगर से कलानी और चौधरी के 'गुंडाराज' को खत्म करने का संकल्प लिया, भाजपा और शिंदे सेना कार्यकर्ताओं के बीच झड़पों के बाद तनाव बढ़ गया। एक भाजपा कार्यकर्ता पर हमले के बाद तनाव बढ़ गया।