शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वीचे सरकार हप्ता घेणारे होते; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बदलापुरात विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 06:43 IST

बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते

लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर: गेल्या दोन वर्षांत आमच्या सरकारने लोकांच्या हितासाठी अनेक कामे केली. पूर्वीचे सरकार हे हप्ता घेणारे सरकार होते आणि आमचे सरकार हे महिला, शेतकरी आणि बेरोजगार यांच्या बँक खात्यात हप्ता भरणारे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केले. बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

अंबरनाथ आणि बदलापूर ही दोन्ही शहरे जलदगतीने वाढत आहेत. या दोन्ही शहरांची एकत्रित पालिका करण्याबाबत विचार व्हावा, अशी मागणी बदलापूरचे शिंदेसेनेचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आपण पुन्हा एकदा विचार करून योग्य तो निर्णय कळवल्यास अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची एकत्रित पालिका करायला हरकत नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.  

एक रुपयाचेही राजकारण करतील...

  • आमचे सरकार फसवे नसून, लोकांसाठी काम करणारे आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून, महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी गेल्या दोन वर्षांत अनेक प्रकल्प राबवले आहेत. 
  • लाडकी बहीण योजनेचा हप्ता भरताना महिलांचे बँक अकाउंट लिंक झालेत की नाही, हे चेक करण्यासाठी सरकार सुरुवातीला एक रुपया टाकणार होते, मात्र विरोधक या एक रुपयाचेही राजकारण करतील, म्हणून आम्ही पूर्ण रक्कम आमच्या भगिनींच्या बँक खात्यात टाकल्याचे शिंदे यांनी सांगितले. 
  • विरोधकांना प्रत्येक योजनेमध्ये केवळ राजकारण दिसत असून, आम्ही जनतेच्या समाधानासाठी काम करत असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आमदार किसन कथोरे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ज्ञानेश्वर म्हात्रे,  खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि राजकीय पुढारी उपस्थित होते.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेbadlapurबदलापूरShrikant Shindeश्रीकांत शिंदे