डोंबिवली बलात्कार प्रकरण! दुसरा आरोपी गजाआड; चार दिवसांची कोठडी 

By प्रशांत माने | Updated: September 22, 2023 18:59 IST2023-09-22T18:58:54+5:302023-09-22T18:59:13+5:30

तरुणीच्या मित्राला दारू आणण्यासाठी पाठवून तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखानपाडा परिसरात रविवारी घडली होती.

Dombivli rape case Second accused arrested Four days in custody | डोंबिवली बलात्कार प्रकरण! दुसरा आरोपी गजाआड; चार दिवसांची कोठडी 

डोंबिवली बलात्कार प्रकरण! दुसरा आरोपी गजाआड; चार दिवसांची कोठडी 

डोंबिवली : तरुणीच्या मित्राला दारू आणण्यासाठी पाठवून तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखानपाडा परिसरात रविवारी घडली होती. या घटनेप्रकरणी बुधवारी विष्णूनगर पोलिसांनी दिनेश गडारी याला बेड्या ठोकल्या होत्या, तर त्याचा साथीदार सुनील राठोड हा पसार झाला होता. त्यालाही पोलिसांनी गुरूवारी रात्री छत्रपती संभाजी नगर येथून अटक केली. दोघांना शुक्रवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एक तरूणासोबत राहणा-या तरूणीवर तिच्या ओळखीचा असलेला दिनेश गडारी आणि त्याचा मित्र सुनील राठोड यांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना घडली होती. दोघांनी पीडित तरुणीच्या मित्राला दारू आणण्यासाठी घराबाहेर पाठवले. तरुणी घरात एकटीच असल्याचा फायदा उठवत दिनेशने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ती कशीबशी घराबाहेर पळाली, तर दिनेशच्या मित्राने तिला गाठले. तिला रिक्षात कोंबत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा विष्णुनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. दिनेशला बेड्या ठोकल्यानंतर त्याचा सहकारी मित्र सुनीलला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले होते.
 

Web Title: Dombivli rape case Second accused arrested Four days in custody