डोंबिवलीत आंदोलकर्ते अन् पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 16:47 IST2021-10-11T16:47:18+5:302021-10-11T16:47:33+5:30
कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून सोमवारी पूर्ण ताकदीनिशी बंद पुकारण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. या

डोंबिवलीत आंदोलकर्ते अन् पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक
डोंबिवली- लखीमपूर हत्याकांडाच्या निषेधार्थ कल्याण डोंबिवली शहरात सोमवारी सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून ठिकठिकाणी निदर्शन करण्यात आली. डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे स्थानकानजीक असलेल्या परिसरातही या दोन्ही पक्षांकडून निदर्शनं करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर आंदोलकर्ते जमा झाले होते. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत लखीमपूर घटनेचा निषेध करण्यात आला.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून सोमवारी पूर्ण ताकदीनिशी बंद पुकारण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.आंदोलन सुरू होताच पोलिसांनी हस्तक्षेप करायला सुरुवात केली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांचा पारा चांगलाच चढला होता. माध्यमांशी संवाद साधतानाही पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक देखील झाली. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.