उल्हासनगरात भरधाव कारने कुत्र्याला चिरडले; विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: June 2, 2024 19:28 IST2024-06-02T19:27:46+5:302024-06-02T19:28:09+5:30
ही घटना ३० मे रोजी सायंकाळी घडली असून समाजसेवक सत्यजित बर्मन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

उल्हासनगरात भरधाव कारने कुत्र्याला चिरडले; विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील मुख्य रस्त्यावर भरधाव कारने कुत्र्याला चिरडल्या प्रकरणी आझाद शहा यांच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस गुन्हा दाखल झाला. ही घटना ३० मे रोजी सायंकाळी घडली असून समाजसेवक सत्यजित बर्मन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
उल्हासनगर कॅम्प नं-४ समतानगर परिसरातील मुख्य रस्त्यावर ३० मे रोजी सायंकाळी साडे सहा वाजता भरधाव वेगाने एका कारने कुत्र्याला चिरडले. या अपघातात कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी सिटीजन फोरमचे सत्यजित बर्मन यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून आझाद शहा यांच्या विरोधात भांदवी कलम २७९, ४२८ आणि मोटर वाहन अधिनियम १८४ च्या कलम ४२९ व पशु क्रूरता निवारण अधिनियमच्या कलम ११(१)(ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ अधिक तपास करीत आहेत.