ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारें विरोधात दिवावासीय एकवटले, शहरात कडकडीत बंद
By अनिकेत घमंडी | Updated: December 17, 2022 13:16 IST2022-12-17T13:16:37+5:302022-12-17T13:16:48+5:30
या बंदला दिवा शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख, मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा देण्यात आला होता...

ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारें विरोधात दिवावासीय एकवटले, शहरात कडकडीत बंद
डोंबिवली: उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे ह्यांनी हिंदू धर्म, साधू संत यांचा अपमान करणारे व हिंदू देव-देवतांचा अवमान करणारे आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल वारकरी संप्रदायाच्या वतीने शनिवारी डोंबिवली, ठाणे बंदची हाक देण्यात आली होती.
या बंदला दिवा शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे शहरप्रमुख, मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा देण्यात आला होता, त्याला व्यापारी वर्ग, रिक्षा चालक मालक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे दिवा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी वारकरी संप्रदायातील मंडळी व बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिवा चौकात उपस्थित होते.