शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीत महाविकास आघाडीची चर्चा फिस्कटली; तर काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.), वंचित बहुजन आघाडी एकत्रित लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:07 IST

...मनसे ५४ तर उद्धवसेना ६० जागा लढविणार असे सूत्र होते. त्यापैकी उद्धवसेनेने त्यांच्या ६० जागांच्या कोट्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांना जागा द्यायच्या होत्या. काँग्रेसने २५ जागांची मागणी केली होती.

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेची निवडणूक मनसे, उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) एकत्रित लढणार होते. मात्र, जागावाटपावरून गणित फिस्कटले. आता मनसे आणि उद्धवसेना एकत्रित लढणार आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि वंचित बहुजन आघाडी एकत्रित लढणार आहेत.

पालिका निवडणूक जाहीर होताच मनसे, उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या नेत्यांच्या बैठका झाल्या. या बैठकीत मनसे नेते राजू पाटील, उद्धवसेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी जागावाटपाचे गणित ठरविले. मनसे ५४ तर उद्धवसेना ६० जागा लढविणार असे सूत्र होते. त्यापैकी उद्धवसेनेने त्यांच्या ६० जागांच्या कोट्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांना जागा द्यायच्या होत्या. काँग्रेसने २५ जागांची मागणी केली होती. ही मागणी उद्धवसेनेने मान्य केली नाही. ६० पैकी २५ जागा काँग्रेसला दिल्या तर राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या वाट्याला जागा उरणार नाही. या मुद्द्यावरून बोलणी फिस्कटली. 

काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि वंचित या नव्या आघाडीत काँग्रेस ७०, राष्ट्रवादी (शरद पवार) ४० आणि वंचित बहुजन आघाडीला १५ जागा देण्याचे गणित ठरले. रात्री उशिरापर्यंत त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

शिंदेसेनेच्या उमेदवारांना रात्रीतून दिले एबी फॉर्म -कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या मंगळवार हा अंतिम दिवस असल्याने सोमवारी रात्री बहुतेक पक्ष आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करतील. शिंदेसेनेने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर न करता सोमवारी रात्री एबी फॉर्मचे वाटप करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंत सर्वच उमेदवारांच्या हातात एबी फॉर्म पडलेला असेल.

कल्याण-डोंबिवलीतून महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेकडून ५०० हुन अधिक उमेदवार इच्छुक होते. कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, डोंबिवली पूर्व पश्चिमेतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवसाच्या आदल्या दिवशी उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : KDMC: Maha Vikas Aghadi talks fail; Congress, NCP, VBA to fight together.

Web Summary : Kalyan-Dombivli alliance talks collapsed over seat sharing. Shiv Sena and MNS will fight together. Congress, NCP (Sharad Pawar), and VBA will contest jointly. Congress demands 70 seats, NCP 40, VBA 15. Shinde's Sena distributes AB forms to candidates.
टॅग्स :Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026