शिल्लक राहिलेले आमदार कुठे जाऊ नयेत म्हणून मध्यवर्ती निवडणूकीची चर्चा; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा टोला
By मुरलीधर भवार | Updated: November 7, 2022 17:02 IST2022-11-07T17:02:20+5:302022-11-07T17:02:38+5:30
शिंदे फडणवीस सरकार हे स्थिर सरकार आहे. या सरकारने गेल्या तीन महिन्यात जनहिताचे जे निर्णय घेतले आहे. हे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

शिल्लक राहिलेले आमदार कुठे जाऊ नयेत म्हणून मध्यवर्ती निवडणूकीची चर्चा; खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा टोला
कल्याण-शिंदे फडणवीस सरकार हे स्थिर सरकार आहे. या सरकारने गेल्या तीन महिन्यात जनहिताचे जे निर्णय घेतले आहे. हे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच प्लॅनिंग करुन मध्यवर्ती निवडणूकीची चर्चा केली जात असल्याचा टोला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
काटई गावात शिवसेना पदाधिकारी अजरून पाटील यांच्या वतीने तुळसी विवाह सोहळ्य़ाचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्य़ास खासदार शिंदे हे उपस्थित होते. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे पदाधिकारी गोपाळ लांडगे, राजेश कदम, राजेश मोरे, सागर जेधे आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी काही आमदार आमच्या संपर्कात आहेत असे वक्तव्य करुन मध्यवर्ती निवडणूका लवकर होतील असे वक्तव्य केले होते. यावर खासदार शिंदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शिंदे फडणवीस हे सरकार स्थीर सरकार आहे कोणाचे आमदार कोणाच्या संपर्कात आहे. हे येणा:या काळात लवकर कळेल. त्यांच्याकडे शिल्लक राहिलेले आमदार हे कुठे जाऊ नयेत यासाठी प्लॅनिंग करुन राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे यांच्याकडून मध्यवर्ती निवडणूकीची चर्चा घडवून आणली जात आहे. शिंदे फडणवीस यांचे सरकार मजबूत सरकार आहे. त्यांच्याकडून ३ महिन्यात जनहिताचे शेतकरी हिताचे निर्णय घेतले गेले. त्यामुळे येत्या दोन वर्षानी निवडणूकांना सामोरे जाताना विरोधकांची काय हालत होईल. हे न बोललेलेच बरे. विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्तापासून सरकू लागली असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ११ हजार कोटीच्या विकास कामाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीसह प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रतील विकासाला गती मिळणार आहे. याशिवाय काटई गावातील समाज मंदीर आणि स्मशानभूमीच्या कामाकरीता ८० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहितीही खासदार शिंदे यांनी यावेळी दिली.