शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीच्या जागावाटप चर्चेवरून भाजपमध्ये नाराजी, आमदारांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:09 IST

सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करीत आम्हाला युती नको अशी भूमिका घेतली...

कल्याण : शिंदेसेना आणि भाजपमधील संभाव्य जागा वाटपाच्या चर्चेवरून कल्याणमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. पूर्वेला अवघ्या सात जागा वाट्याला आल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्याकडून संताप व्यक्त करण्यात आला. कल्याण पूर्वेच्या आ. सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करीत आम्हाला युती नको अशी भूमिका घेतली.

पश्चिमेकडील भागातही भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, स्थानिक नेत्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. जागावाटपात शिंदेसेनेच्या वाट्याला अधिक जागा आल्याची चर्चा शनिवारी रात्री वाऱ्यासारखी पसरली. त्यात कल्याण पूर्वेत भाजपच्या वाट्याला अवघ्या सात जागा आल्याची माहिती समजताच कार्यकर्ते संतापले.

भाजपतील नाराजीबाबत माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी पक्षात कोणतीही नाराज नसल्याचे सांगितले. परंतु हे सांगताना ते पत्रकारांवर भडकले. कॅमेरे बंद करा नाहीतर मी फेकून देईन अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

प्रचारादरम्यान ही नाराजी उफाळून येते का याकडे नेत्यांचेलक्ष लागले आहे. कार्यकर्ते झाले आक्रमक कार्यकर्ते आक्रमक झाल्याची माहिती मिळताच भाजपचे निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी हे त्या ठिकाणी पोहोचले आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना शांत केले. भाजप कार्यकर्त्यांची ही नाराजी आणि युतीबाबत असलेल्या त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवू, अशी प्रतिक्रिया यावेळी सूर्यवंशी यांनी दिली.

कल्याणमध्ये निदर्शने -रविवारी सकाळी कल्याण पश्चिमेकडील भागातही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. नगरपालिका निवडणुकीप्रमाणे या ठिकाणीही युतीऐवजी मैत्रीपूर्ण लढती घेण्याची मागणी भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांनी केली. यावेळी दादागिरी नहीं चलेगीच्या घोषणा यावेळी दिल्या.

मुस्कटदाबी कशासाठी? -कल्याण पश्चिमेतील ३८ जागा जिंकण्याची भाजपची ताकद आहे. कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी कशासाठी ? अशी आक्रमक भूमिका भाजपचे माजी आ. नरेंद्र पवार यांनी मांडली.

युतीतच लढा -प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. चर्चेनंतर आहे त्या जागांवर समाधान माना, युतीतच लढा अशा सूचना चव्हाण यांनी दिल्याची माहिती आ. गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :kalyanकल्याणBJPभाजपाMahayutiमहायुती