शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 10:55 IST

डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये तीव्र पाणीटंचाई

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. आठ दिवसांपासून घरात  अंघोळीसाठी पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही, तर बाकी सगळी कामे कशी होणार? या पाणी टंचाईला कंटाळून एमआयडीसी निवासी भागातील काशीनाथ सोनावणे (वय ७६) या दिव्यांग वयोवृद्धाने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. अनिल शिंदे या तरुणाच्या प्रसंगावधानामुळे वयोवृद्ध वाचला.

डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात गेले काही दिवस टंचाई आहे. काही इमारतींत गेला आठवडाभर पाण्याचा एकही थेंब आला नसल्याने नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयात जाऊन जाब विचारला.  त्यांच्याकडून थातूरमातूर उत्तरे दिली गेली. एमआयडीसीचे अधिकारी पाणी टंचाईची तक्रार करणाऱ्या नागरिकांना पाइपलाइन बदला, पाइपलाइनची तपासणी करतो, असे सांगत होते. 

टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांची सहनशीलता संपुष्टात आल्याने सोनावणे यांनी ते राहत असलेल्या गुरुदेव सोसायटीच्या गच्चीवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना अनिल या तरुणाने पाहिले. त्याने त्यांची समजूत काढून खाली आणले. 

या घटनेनंतर साेशल मीडियावर जाेरदार चर्चा रंगली. अनेकांनी शासनाच्या कारभारावर टीका केली. शहरातील पाणीटंचाई त्वरित दूर करावी, अशी मागणी या घटनेच्या निमित्ताने कल्याण-डाेंबिवली पालिकेसह पाणी पुरवठा विभागाकडे करण्यात आली.

टँकरमाफियांना पाणी मिळते, आम्हाला का नाही?

आ. मोरे यांनी सांगितले की, पाणी प्रश्नावर शिंदे सेनेचे आ. राजेश मोरे यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेतली. टँकरमाफियांना पाणी मिळते, आम्हाला का मिळत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी आमदारांना विचारला. २७ गावांतील पिसवली, देशमुख होम, गोळवली, दावडी, रिजन्सी या परिसरात महिनाभरापासून पाणीटंचाई आहे. नागरिकांचा रोष वाढत चालल्याने पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. २७ गावांत अमृत योजनेचे काम सुरू आहे. येत्या गुरुवारी पुन्हा पाणीप्रश्नावर आढावा बैठक घेतली जाणार आहे. यावेळी मिलापनगरमधील रहिवाशांनी अधीक्षक अभियंता बी. बी. हर्षे यांना निवेदन सादर केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Disabled Senior Tries Suicide Due to Water Scarcity in Dombivli

Web Summary : Frustrated by severe water scarcity, a disabled 76-year-old in Dombivli attempted suicide. Timely intervention saved him. Residents are facing acute water shortage, prompting anger and calls for immediate action from authorities to resolve the crisis.
टॅग्स :dombivaliडोंबिवलीwater shortageपाणी कपातwater scarcityपाणी टंचाई