हद्दपार गुंडाला तलवारीसह अटक
By सदानंद नाईक | Updated: July 3, 2024 18:40 IST2024-07-03T18:40:11+5:302024-07-03T18:40:32+5:30
उल्हासनगर : कॅम्प नं-२, रमाबाई आंबेडकरनगर येथे मंगळवारी रात्री तडीपार गुंड सोनामनी उर्फ आशिष बिपीन झा याला पोलिसांनी तलवारीसह ...

हद्दपार गुंडाला तलवारीसह अटक
उल्हासनगर : कॅम्प नं-२, रमाबाई आंबेडकरनगर येथे मंगळवारी रात्री तडीपार गुंड सोनामनी उर्फ आशिष बिपीन झा याला पोलिसांनी तलवारीसह अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-२, रमाबाई आंबेडकरनगर येथे राहणारा सोनामनी उर्फ आशिष बिपिन झा या गुंडाला २ वर्षासाठी बृहन्मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे व रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत तालुक्यातून पोलीस परिमंडळ-४ विभागाने तडीपार केले होते. मात्र तडीपारीचा भंग करणाऱ्या आशिष झा या गुंडाला मंगळवारी रात्री तलवारीसह रमाबाई आंबेडकरनगर येथून पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. पोलीस परिमंडळ-४ ने तडीपार केलेल्या अनेक गुंडाचा वावर शहरात असल्याचे बोलले जात असून कारवाईची मागणी होत आहे.