शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा डझन गुन्हेगारांकडे मनोरुग्ण असल्याचे प्रमाणपत्र; गंभीर गुन्ह्यात मिळवला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 07:23 IST

विशाल गवळीने प्रमाणपत्र कसे मिळवले याची चौकशी करण्याची मागणी

कल्याण :कल्याणमधील राजकीय वरदहस्त लाभलेला गुंड विशाल गवळी व अन्य किमान पाच ते सहा गुन्हेगारांनी मानसिक रुग्ण असल्याची प्रमाणपत्रे मिळवली आहेत. त्याद्वारे विनयभंग, छेडछाड अशा गंभीर गुन्ह्यात त्यांनी जामीन मिळवला असल्याची धक्कादायक माहिती आहे. गवळीच्या चौकशीत याचा उलगडा झाला. तर ज्यांनी-ज्यांनी अशी प्रमाणपत्रे मिळवली आहेत, त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी पीडित मुली व महिलांनी केली आहे.

एका अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणारा आराेपी गवळी याच्याकडे मानसिक रुग्ण असल्याचे प्रमाणपत्र आहे. विशालच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, विशालकडे मानसिक रुग्ण असल्याचे प्रमाणपत्र आहे. त्याने या प्रमाणपत्राच्या आधारेच या आधी जामीन मिळवला. विशालने यापूर्वी कल्याण पूर्वेतील काही मुली व महिलांशी गैरवर्तन केल्याची तक्रार आहे. परंतु, राजकीय पक्षाच्या नेत्यांचे आशीर्वाद व मानसिक रुग्ण असल्याचे मिळवलेले बनावट प्रमाणपत्र यामुळे तो तुरुंगाच्या बाहेर येऊन पुन्हा तेच उद्योग करीत होता. 

... तर बचाव करणे अशक्य

वकील महेश शिवदास यांनी सांगितले की, न्यायालय संबंधित आरोपी मानसिक रुग्ण आहे की नाही, याची चौकशी करते. संबंधित आरोपीला सरकारी रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञांकडे पाठवून त्यांचे मत विचारात घेतले जाते.

एखाद्या गुन्हेगारावर कोणत्या गुन्ह्याकरिता खटला सुरू आहे, याचे गांभीर्य त्याला कळले आहे की, नाही हे न्यायालय तपासून पाहते. एखाद्या गुन्हेगाराने आपण मनोरुग्ण असल्याचा दावा केला, तर जिल्हा शल्यचिकित्सकांकडून त्याची तपासणी केली जाते. 

त्यानंतर त्याच्यावर कसा खटला चालवायचा, याचा निर्णय होतो. गवळीच्या प्रकरणात त्याने एकदा गुन्हा केला व तो जामिनावर सुटला. मात्र, आता त्याने पुन्हा तसाच किंवा त्यापेक्षा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्याने पुन्हा तो मनोरुग्ण असल्याचे सांगून बचाव करू शकत नाही.

आरोपी विशाल गवळीची वैद्यकीय तपासणी

आरोपी विशाल गवळीला उल्हासनगरच्या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरिता आणणार असल्याने रुग्णालयाबाहेर सकाळी ११ वाजल्यापासून पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

दुपारी तीन वाजता त्याला रुग्णालयात आणले. दोन तासांच्या तपासणीनंतर त्याला पुन्हा कल्याणला कोळसेवाडी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. सुरक्षेच्या कारणांमुळे आरोपी विशाल गवळीला वैद्यकीय तपासणीकरिता कल्याणच्या  रुक्मिणीबाई रुग्णालयात नेणे पोलिसांनी टाळले.  

उल्हासनगरच्या सरकारी रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार, विशाल गवळी हा मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे सांगण्यात आले आहे.

महापालिकेच्या रुग्णालयात अशा प्रकारचे मासनिक रुग्ण असल्याचे प्रमाणपत्र दिले गेलेले नाही. याची शहानिशा आम्ही केली. हे प्रमाणपत्र खासगी मानसपचोर तज्ज्ञांकडून दिले गेले असावे.- डॉ. दीपा शुक्ल, मुख्य वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी.

मनोरुग्ण असल्याचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार महापालिका रुग्णालयांना आणि सिव्हील सर्जनला आहे.  संबंधित आरोपीकडे कोणते प्रमाणपत्र  आहे, हे पाहावे लागले. त्यावर कोणाची सही शिक्के आहेत. त्याने खोटे प्रमापत्रही मिळवले असावे. पोलिसांनी त्याचा तपास करावा.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.

मानसिक रुग्ण असल्याचे प्रमाणपत्र हे सरकारी रुग्णालयात मिळते, तसेच ते खासगी डॉक्टरही देऊ शकतो. सगळ्या चाचण्या केल्यावर एखादी व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्यावर तसा दाखला दिला जातो. - डॉ. अद्वैत पाध्ये, मानसोपचारतज्ज्ञ. 

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस