रेल्वेच्या धडकेत रुपसिंग देलवार याचा मृत्यू
By अनिकेत घमंडी | Updated: May 9, 2023 15:56 IST2023-05-09T15:56:26+5:302023-05-09T15:56:38+5:30
सर्व कागदपत्रांची पूर्तता करून मंगळवारी महापालिकेच्या कल्याण येथील रुक्मिणीचबाई रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

रेल्वेच्या धडकेत रुपसिंग देलवार याचा मृत्यू
डोंबिवली: अज्ञात रेल्वेच्या धडकेत रूपसिंग देलवार(४७) रा. रोहिदास कृपा, लो. टिळक कॉलेज रोड, आजदे, डोंबिवली पूर्व या इसमाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिराने डोंबिवली कोपर रेल्वे मार्गावर डाऊन स्लो ट्रॅकदरम्यान घडली. त्या घटनेत मयताच्या डोक्याला, पायाला जखम झाली होती, त्या अपघाताची माहिती मिळताच डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्यास उपचारासाठी नेण्याआधिच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगून त्यास मयत घोषित केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या पश्चात बायको, मुले, मुलगी असा परिवार आहे.
सर्व कागदपत्रांची पूर्तता करून मंगळवारी महापालिकेच्या कल्याण येथील रुक्मिणीचबाई रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर कुटुंबियांकडे।दिल्यावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या अपघाताची डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.