Coronavirus Vaccination : कल्याण-डोंबिवलीत बुधवारी लसीकरण नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 22:42 IST2021-06-29T22:41:55+5:302021-06-29T22:42:36+5:30
Covid 19 Vaccine : लससाठा उपलब्ध न झाल्यानं कल्याण-डोंबिवलीत उद्या लसीकरण बंद.

Coronavirus Vaccination : कल्याण-डोंबिवलीत बुधवारी लसीकरण नाही
ठळक मुद्देलससाठा उपलब्ध न झाल्यानं कल्याण-डोंबिवलीत उद्या लसीकरण बंद.
शासनाकडून लससाठा उपलब्ध न झाल्यामुळे कल्याणडोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या महिन्यात पाचव्यांदा अपुऱ्या लसीच्या साठ्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे.
एकीकडे शेजारील ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात लसीकरण प्रक्रिया वेगाने सुरू असताना कल्याणडोंबिवली मध्ये मात्र लसीकरण प्रक्रिया वारंवार बंद ठेवावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत असून वरिष्ठ पातळीवर लसीचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा याकरिता प्रयत्न करावे अशी अपेक्षा कल्याण डोंबिवलीकर व्यक्त करत आहेत.