शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
4
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
5
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
6
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
7
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
8
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
9
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
10
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
11
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
12
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
13
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
14
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
15
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
16
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
17
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
18
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
19
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
20
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : "या"  कारणामुळे कल्याण-डोंबिवलीत घटली रुग्णसंख्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 16:15 IST

Coronavirus in KDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत   गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची  संख्या कमी होत आहे. यामुळे शहरात सध्या सकारात्मक वातावरण  निर्माण होत आहे.

- मयुरी चव्हाणकल्याण  - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत   गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची  संख्या कमी होत आहे. यामुळे शहरात सध्या सकारात्मक वातावरण  निर्माण होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक नागरिक मास्क लावत नव्हते. मात्र या लाटेत कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत असल्याने मास्क लावण्याबाबत अनेक स्तरातून जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे  मुख्यत्वे मास्क लावण्या-यांची संख्या देखील वाढली. यामुळे कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. अन्य ठिकाणी कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत असताना कल्याण डोंबिवली शहरात मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर  होती. त्यामुळे काहीसे चिंतेचे वातावरण होते. गेल्या काही दिवसात रूग्णसंख्येत घट होत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. कडक  निर्बंध लागू केल्यामुळे  याचा थेट परिणाम म्हणजे रुग्णांची आकडेवारी कमी  झाली. 80 टक्के लोकांनी नियम पाळले. मास्क घालण्याचे प्रमाण देखील वाढले. मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाल्यानं कल्याण डोंबिवलीकरांनी  देखील आपली योग्य ती काळजी घेतली. तसेच  कोरोनाची  सौम्य लक्षण जाणवताच  बहुसंख्य लोक तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने घरच्या घरी बरे झाले.  महापालिकेने काँटॅक्ट  ट्रेसिंग देखील वाढवले. या सर्व गोष्टींमुळे रुग्णसंख्या  कमी होण्यास मदत झाली असे मत आयएमएचे कल्याणचे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले. दुकान बंद असल्यामुळे नागरिकांनी देखील घरीच राहण पसंत केलं. त्यामुळे बाजारात होणाऱ्या गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवणं शक्य झाल्याचे दिसून येते. 

 तर ....   हे सुद्धा  दिवस जातील 

रुग्णसंख्या सध्या कमी झाली असली  तरी भविष्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी  लसीकरणाचा वेग  वाढविण्याची गरज असल्याच डॉ पाटील यांनी स्पष्ट केले आहे. इतर देशात लसीकरणाचा वेग  वाढल्यानं  तेथील पॉझिटिव्ह  रुग्णसंख्या ही अवघी 1 ते 2 टक्क्यांवर  आली आहे. आपल्याकडे लसीकरणाचा  वेग वाढला तर   हे चित्र आपल्याकडेही  दिसू शकते असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.  मात्र सध्या कल्याण डोंबिवलीत लसींचा तुटवडा असल्याने वारंवार लसीकरण  केंद्र बंद ठेवावी लागत आहे. हे  चित्र बदलण्यासाठी  केंद्र आणि राज्य सरकारने  लसींचा साठा, वितरण आणि वेग याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

गेल्या काही दिवसांतील रुग्णसंख्या 

तारीख           रुग्णसंख्या 

3 मेे  - 498 

2 मे - 729 

1 मे -822 

30 एप्रिल- 819 

29  एप्रिल-835 

28  एप्रिल - 1091 

27  एप्रिल-  749

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका