शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: खाकीतल्या माणूसकीमुळे त्याला मिळाले जीवदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 15:58 IST

Coronavirus: त्याची कोविड टेस्ट पॉझीटीव्ह आली. त्याला लंग्ज इन्फेक्शन १०० टक्के, ऑक्सीजन लेव्हल ६० आणि त्यात त्याला रक्तदाब, मधूमेह, ह्रदविकार या सहव्याधी. त्यामुळे त्याचे प्राण वाचविण्यासाठी त्याचा भाऊ वणवण फिरत होता.

कल्याण - त्याची कोविड टेस्ट पॉझीटीव्ह आली. त्याला लंग्ज इन्फेक्शन १०० टक्के, ऑक्सीजन लेव्हल ६० आणि त्यात त्याला रक्तदाब, मधूमेह, ह्रदविकार या सहव्याधी. त्यामुळे त्याचे प्राण वाचविण्यासाठी त्याचा भाऊ वणवण फिरत होता. त्याला व्हेंटीलेटर बेड उपलब्ध होत नव्हता. त्याच्या भावाने अखेरीस पोलिसांना फोन केला. तेव्हा पोलिसांच्या मदतीने त्याला बेड मिळाला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. त्याला जीवदान मिळाले ते केवळ खाकीतल्या माणूसकीमुळे. त्याने पोलिसांच्या या कृतीविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. हे सांगताना त्याच्यासह त्याच्या भावाचे डोळे पाणावले होते.दीपक पाटील हे कल्याण पश्चिम भागातील आधारवाडी परिसरात राहतात. त्ये व्यवसायिक आहेत. त्यांचा भाऊ कैलास याला कोरोना झाला. त्याची सिटीस्कॅन केल्यावर त्याचे लंग्समध्ये १०० टक्के इन्फेक्शन होते. तसेच त्याची ऑक्सीजन लेव्हल ६०  इतकी कमी झाली होती. त्यात त्याला रक्तदाब, मधूमेह आणि ह्रदयविकार हे सहव्याधीह होते. ७ एप्रिल रोजी दीपक हे भावाला बेड मिळावा यासाठी सगळ्य़ा रुग्णालयाच फिरत होते. मात्र कोरोनाची दुसरी लाट इतकी तीव्र होती की,  त्याना कुठेही बेड उपलब्ध होत नव्हता. तेव्हा त्यांनी शेवटची संधी म्हणून सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार आणि बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक यशवंत चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. रात्री दीपक यांचा फोन आला तेव्हा चव्हाण हे कर्तव्यावर हजर होते. त्यांनी दोन पोलीस अधिका:यांना ही बाब सूचित केले. तेव्हा दीपक यांच्या भावाला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयात व्हेटींलेटर बेड उपलब्ध करुन दिला. कैलासवर उपचार सुरु झाले. तेव्हा कुठे दीपकचा जीव भांडय़ात पडला. त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.मात्र भाऊ बरा होईल की नाही याची चिंता त्यांना खात होती. कारण भावाच्या मागे त्याची पत्नी, दोन मुले असा परिवार. त्यांचे काय होईल. मात्र रुग्णालयात कैलास यांच्यावर महिनाभर उपचार झाल्यावर योगायोगाने कैलास यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच ७ मे रोजी कैलास बरे होऊन घरी परतले. तेव्हा कैलास यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या भावाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यानंतर आत्ता कैलास पूर्ण बरे झाले आहे. कैलासला खाकीमुळे जीवदान मिळाले. यामुळे दोन्ही भावांनी सहाय्यक आयुक्त पोवार यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरिक्षक चव्हाण यांचा पोलिस ठाण्यात जाऊन सकार केला. केलेल्या मदतीविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पोवार आणि चव्हाण यांच्या सह दोन्ही भाऊ भाऊक झाले होते. पोलिसांमुळेच आज माझा भाऊ या जगात आहे अशी प्रतिक्रिया दीपक यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसkalyanकल्याण