शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

चिंता वाढली... इंग्लंडहून कल्याण डोंबिवलीत आलेल्या एकाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 4:07 PM

पुण्याला पाठविला अहवाल, आरोग्य विभागाची माहिती

ठळक मुद्देइंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोना विष्णाणूच्या जनुकीय रचनेत बदल झालेला आहे

कल्याण - इंग्लंडहूनकल्याण डोंबिवलीत आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. आत्तार्पयत २० जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी सात जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर एकाची टेस्ट पॉझिटीव्ह आली असून ही रुग्ण महिला आहे. तिचा अहवाल आत्ता मुंबईनंतर पुण्याला पाठविला जाणार आहे. टेस्ट पॉझिटीव्ह आलेल्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. आता, पुण्याचा अहवाल काय येतो याकडे कल्याण डोंबिवलीकरांचे लक्ष लागले असून तो अहवाल जर पॉझिटीव्ह आला तर कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढू शकते. 

इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोना विष्णाणूच्या जनुकीय रचनेत बदल झालेला आहे. नवीन विषाणूंचा स्ट्रेन दिसून आल्याने खबरदारीची उपाय योजना म्हणून केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान इंग्लंडहून कल्याण डोंबिवलीत आलेल्या ५५ जणांची यादी महापालिकेस सरकारने दिली होती. या यादीत काही नावे डबल होती.तसेच काही जण हे कल्याण डोंबिवली क्षेत्रबाहेरील होते. त्यानुसार महापालिकेने ४५ जणांचे सर्वेक्षण केले. एकूण ४५ जणांपैकी २० जणांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. त्यापैकी सात जणांची टेस्ट ही निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे महापालिकेने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र रात्री उशिरा एका महिलेचा टेस्ट रिपोर्ट हा पॉझीटीव्ह आला आहे. तिचा रिपोर्ट मुंबईतील एनआयव्हीला पाठविला गेला. त्याठिकाणी तिचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. तिचा रिपोर्ट आत्ता पुण्यातील एनआयव्हीला पाठविला गेला आहे. रिपोर्ट पॉङिाटीव्ह आलेली रुग्ण ही १९ वर्षाची तरुणी आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्यात इतर कुठलीही लक्षणो दिसून आलेली नाहीत. तिला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. तिचा अहवाल जनुकीय रचनेच्या तपासणीकरीता पुण्याला  पाठविण्यात आला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे. दरम्यान, नववर्षाच्या पाश्र्वभूमीवर सुट्टय़ा सगल जोडून आलेल्या आहेत. नववर्षाच्या पाश्वभूमीवर नागरीकांनी गर्दी करणो टाळावे. घराबाहेर फिरताना न चूकता मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. काही लक्षणे आढळून आल्यास नजीगच्या आरोग्य केंद्राशी तातडीने संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण