राहुल गांधींवरील कारवाई विरोधात बदलापूरमध्ये काँग्रेसची निदर्शने

By पंकज पाटील | Updated: March 27, 2023 19:32 IST2023-03-27T19:32:21+5:302023-03-27T19:32:34+5:30

बदलापूरमधील महात्मा गांधी चौकात केला निषेध

Congress protests in Badlapur against action against Rahul Gandhi | राहुल गांधींवरील कारवाई विरोधात बदलापूरमध्ये काँग्रेसची निदर्शने

राहुल गांधींवरील कारवाई विरोधात बदलापूरमध्ये काँग्रेसची निदर्शने

पंकज पाटील, बदलापूर: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा धसका घेतल्यानेच भाजपाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घाईघाईने घेतल्याचा आरोप बदलापूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष संजय जाधव यांनी केला.

राहुल गांधी यांची खासदारकी भाजपाने रद्द केल्याच्या निषेधार्थ बदलापूर ब्लॉक काँग्रेसच्या  वतीने आज बदलापूरमधील महात्मा गांधी चौकात ब्लॉक अध्यक्ष संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर त्यांना न्यायालयाने दिलेल्या मुदतीची वाट न  बघताच त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय भाजपाने तडकाफडकी घेतल्याचा आरोप जाधव यांनी केला. भारतात सध्या लोकशाही संपुष्ठात आल्याची शंका राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाने वाटते अशी टीका त्यांनी यांनी केली.  या निदर्शनांमध्ये दादासाहेब पाटील, हरिचंद्र थोरात, सुरेश मोहिते , तसेच महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.

 

Web Title: Congress protests in Badlapur against action against Rahul Gandhi