पत्री पूलाच्या गर्डर आधी अप्रोच रोडचे काम पूर्ण करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 05:43 PM2020-11-21T17:43:53+5:302020-11-21T17:44:17+5:30

९० फुटी रस्त्याच्या अप्रोच रोडची केली पाहणी; आयुक्तांच्या भेटीचा प्रयत्न

Complete the approach road work first Demands MNS MLA Raju Patil | पत्री पूलाच्या गर्डर आधी अप्रोच रोडचे काम पूर्ण करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

पत्री पूलाच्या गर्डर आधी अप्रोच रोडचे काम पूर्ण करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

Next

कल्याण-कल्याणच्या पत्री पुलाच्या कामात आधीच विलंब झाला आहे. या पूलाला ९० फुटी रस्त्याचा अप्रोच रोड आहे. या अप्रोच रोडचे काम गेल्या सहा वर्षापासून अर्धवट आहे. या रस्त्याचे काम पूर्ण केले तर वाहतूक कोंडी सुटू शकते. अन्यथा पत्री पुलाचे काम पूर्ण करुन काही उपयोग होणार नाही याकडे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

९० फुटी रस्त्या हा पत्री पूलाला येऊन मिळतो. हा अप्रोच रोडचे काम पत्री पुलानजीक रखडले आहे. या पूलाचे काम शिवसेनेच्या माजी महापौरांमुळे अडले आहे. हे काम गेल्या सहा वर्षापासून केले जात नाही. या रस्त्याच्या प्रकरणी स्थानिक नागरीक काशीनाथ गुरव यांनी राज्यपालार्पयत पाठपुरावा केला गेला आहे. त्याची दखल घेतली जात नाही. आज दुपारी एकीकडे पत्री पूलाच्या गर्डरचे लॉचिंग सुरु असताना आमदार पाटील यांनी ९० फूटी अर्धवट असलेल्या अप्रोच रस्त्याची पाहणी करन महापालिका अभियंत्यास जाब विचारला. यावेळी जागरुक नागरीक गुरुव यांचीही भेट घेतली. अभियंत्यास नीट उत्तरे देता येत नसल्याने पत्री पूलाच्या दिशेने आमदार मनसे कार्यकत्र्यासह निघाले असता पूलाच्या एका टोकास  आमदारांसह कार्यकत्र्याची पोलिसांनी अडवणूक केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला. त्यावर मनसे आमदारांनी आम्हाला आयुक्तांना भेटायचे आहे. त्यांना इथे बोलवा अन्यथा आम्हाला त्याठिकाणी जाऊ द्या असा आग्रह धरला. आमदार पाटील हे पूलाच्या ठिकाणी येताच आयुक्त त्याठिकाणाहून निघून गेले आहे. आयुक्तांशी फोनवर बोलणी केली असता त्यांनी सोमवारी यावर चर्चा करण्याचे मान्य केले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पत्री पूलाच्या कामात आधीच विलंब झाला असून पूलाच्या गर्डरचे लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही. पूलाच्या कामाच्या ठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आले होते. डोंबिवली हे त्यांचे आजोळ आहे. त्यांनी पत्री पूलाप्रमाणो कोपर पूल, मोठा गाव ठाकूर्ली-माणकोली खाडी पूल, दुर्गाडी पूल, पलावा पूल आणि आंबिवली येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम मार्गी लावण्यासाठी लक्ष घालावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. मनसेच्या कार्यकत्र्यानी सोशल मिडियावर पूलाचे गर्डर बसवण्याचा एव्हेंट केला जात आहे. पूलाचे गर्डर सरविण्यासाठी आदित्य ठाकरे येत आहेत. याचे व्यंग चित्र सोशल मिडियावर व्हायरल केले होते.

भाजपच्या नगरसेविका रेखा चौधरी यांनी सांगितले की, पत्री पूलाचे काम हे गेल्या अनेक दिवसापासून रखडलेले आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नांनी हे काम होत असल्याचे सांगितले. त्यांच्या या व्यक्तव्याने त्यांनी शिवसेनाला श्रेय दिले नाही. अन्य पूलही मार्गी लावले जावेत. कल्याण डोंबिवलीकर चारही बाजूने पूल कोंडीत सापडले असल्याची टिकाही चौधरी यांनी केली.

Web Title: Complete the approach road work first Demands MNS MLA Raju Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.