बदलापुरात केमिकल टँकरची दुभाजकाला धडक; सुदैवाने टँकर उलटला नाही

By पंकज पाटील | Published: December 30, 2023 09:55 PM2023-12-30T21:55:15+5:302023-12-30T21:55:41+5:30

या वळणावर याआधी देखील अनेक अपघात घडले आहेत

Chemical tanker collides with divider in Badlapur; Fortunately the tanker did not overturn | बदलापुरात केमिकल टँकरची दुभाजकाला धडक; सुदैवाने टँकर उलटला नाही

बदलापुरात केमिकल टँकरची दुभाजकाला धडक; सुदैवाने टँकर उलटला नाही

पंकज पाटील, बदलापूर: बदलापुरात पाटील पेट्रोल पंप समोर असलेल्या धोकादायक वळणावर एका केमिकलच्या टँकरने दुभाजकाला धडक दिली. सुदैवाने हा टँकर उलटला नाही. या अपघातानंतर या धोकादायक वळणावर योग्य उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. बदलापुरात सकाळच्या सुमारास अंबरनाथहून बदलापूरच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव केमिकलच्या टँकरने पाटील पेट्रोल पंप समोरील धोकादायक वळणावर टँकर थेट दुभाजकावर चढवला.

या वळणावर याआधी देखील अनेक अपघात घडले आहेत. आता थेट केमिकलचा टँकरच या दुभाजकावर चढल्याने आता या ठिकाणी योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. हा अपघात ज्यावेळेस घडला त्यावेळेस शेजारी असलेल्या एका दुचाकी चालकाला देखील या टँकरची धडक लागली आणि त्यात तो देखील किरकोळ जखमी झाला. दुभाजकाला धडक दिल्यानंतर टँकर उलटण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने टँकर सुस्थितीत राहिल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातानंतर एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी हा टँकर बाजूला काढत रस्ता मोकळा केला.

Web Title: Chemical tanker collides with divider in Badlapur; Fortunately the tanker did not overturn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.