शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील केमिकल प्रदूषणामुळे नाल्याचा प्रवाह झाला हिरवा, केडीएमसी आयुक्तांनी घेतली गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 14:09 IST

Chemical pollution in Dombivali : डोंबिवली औद्योगिक परिसरातील रासायनिक कंपन्यांकडून जल आणि वायू प्रदूषण केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जातात. 

कल्याण - डोंबिवलीतीलप्रदूषणाचा प्रश्न भर पावसात पुन्हा चर्चेत आला आहे. डोंबिवलीतील एका कंपनीने मुसळधार पावसाचा फायदा घेत चक्क नाल्यात केमिकल सोडल्याने नाल्याचा प्रवाह हिरवा झाला. या प्रकरणाची कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. एमआयडीने या कंपनीचा पाणी पुरवठा खंडीत केला आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे. डोंबिवली प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत आहे. डोंबिवली औद्योगिक परिसरातील रासायनिक कंपन्यांकडून जल आणि वायू प्रदूषण केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जातात.     डोंबिवली पूर्व परिसरातील गांधीनगर परिसरातून वाहणाऱ्या नाल्याचा प्रवाह हिरवा झाला. हा हिरवा प्रवाह पाहून नागरिकांना लगेच कळाले की हा पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह नसून प्रदूषित पाण्याचा प्रवाह आहे. या हिरव्या नाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणाची कल्याण डोंबिवली आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी एमआयडीकडे संपर्क साधला असता एमआयडीसीने या प्रकरणी रायबो फाम या कंपनीचा पाणी पुरवठा खंडीत केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या कंपनीच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी सूचना आयुक्तांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे. या सगळ्य़ा प्रकारानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल करण्यात आली नाही. 

गांधीनगर परिसरात राहणारे नागरीक शशीकांत कोकाटे यांनी सांगितले की, रासायनिक कंपन्या रासायनिक पाणी साठवून ठेवतात. भर पावसात ते नाल्यात सोडण्याचा प्रताप करतात. हा नागरीकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार आहे. या घटनेची दखल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट करुन जीवघेण्या प्रदूषणापासून डोंबिवलीतील नागरिकांची सुटका कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.     

दरम्यान 2014 साली डोंबिवली प्रदूषणामुळे हिरवा पाऊस पडला होता. तर 2019 मध्ये डोंबिवलीत प्रदूषणामुळे रस्ता गुलाबी झाला होता. त्याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली होती. त्यानंतर प्रदूषण करणाऱ्या कंपन्या सुधारल्या नाही तर त्यांना टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय, अग्निशमन दल आदींनी संयुक्तरित्या 302 कंपन्यांचे सर्वेक्षण केले होते. कोरोनामुळे पुढे काही एक कार्यवाही झाली नाही. 

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीpollutionप्रदूषणWaterपाणीMNSमनसेkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाRaju Patilराजू पाटील