शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

मध्य रेल्वेने जुलै २०२१ मध्ये ५.३३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 20:23 IST

जुलै २०२१ मध्ये मध्य रेल्वेने ५.३३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यात ४.२५ दशलक्ष टन होती.

डोंबिवली: जुलै २०२१ मध्ये मध्य रेल्वेने ५.३३ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्यात ४.२५ दशलक्ष टन होती.  जुलै २०२१ मधील मालवाहतूक लोडिंगमध्ये जुलै २०२० च्या तुलनेत २५.४१% ची वाढ नोंदवण्यात आली. बीडीयूच्या पुढाकाराने जुलै २०२१ च्या महिन्यात ऑटोमोबाईलचे जवळजवळ ५१ एनएमजी रेक लोड झाले, ज्यात मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील नाशिकरोड येथून २९ एनएमजी रेक, पुणे विभागातील  चिंचवडमधून २० एनएचएमजी रेक  आणि मुंबई विभागातील कळंबोली येथून २ एनएमजी रेक लोड झाले.  

मध्य रेल्वेच्या झोनल आणि विभागीय स्तरावर स्थापन केलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्स (BDUs) ने घेतलेले पुढाकार या अधिक मालवाहतुकीसाठी प्रामुख्याने  कारणीभूत ठरले आहेत.  हे "बीडीयू" विविध मालवाहक, नवीन ग्राहक, व्यापार संस्था आणि लॉजिस्टिक कंपन्यांनी सादर केलेले नवीन प्रस्ताव, योजना आणि सूचना विचारात घेतात.  या उपक्रमांमुळे रेल्वेकडे अनेक नवीन मालवाहतूक आकर्षित झाली आणि व्यापार आणि उद्योगाशी संबंध वाढला.  हे "बीडीयू" स्थानिक शेतकरी, लोडर, लॉजिस्टिक कंपन्या आणि वैयक्तिक नवीन प्रस्ताव आणि लवचिक योजनांचे आक्रमकपणे मार्केटिंग करतात आणि त्यांच्या मागण्या एकत्रित करतात.  विभागवार  कामगिरी

 मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने जुलै २०२१ मध्ये १.३७ दशलक्ष टन मालवाहतूक नोंदविली आहे, गेल्या वर्षीच्या १.२३ दशलक्ष टन मालवाहतूकीच्या तुलनेत ११.३०% ची वाढ दिसून आली.  या वाढीचे श्रेय लोह व स्टील, खते आणि कंटेनरची झालेल्या उत्तम लोडिंगला आहे.

 मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने जुलै २०२१ महिन्यात २.८७ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे, गेल्या वर्षीच्या २.१० दशलक्ष टन मालवाहतूकीच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या सर्व विभागांपेक्षा अधिक ३६.६७% इतकी वाढ नोंदवली आहे.  या विभागानतून केवळ कोळसा, सिमेंट क्लिंकर या पारंपारिक मालवाहतूक लोडिंग मध्ये चांगली कामगिरी दाखवली नाही तर कापुसाच्या गाठी, साखर आणि फ्लाय ॲश इत्यादीं नवीन मालाला आकर्षित केले.

 जुलै २०२१ मध्ये सोलापूर विभागाने ०.५४ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे, गेल्या वर्षीच्या ०.४२ दशलक्ष टन मालवाहतूकीच्या तुलनेत २७.५९ टक्क्यांनी वाढली आहे.  ही वाढ सिमेंट आणि साखर यासारख्या मुख्य मालाच्या चांगल्या लोडिंगमुळे झाली आहे.

 भुसावळ विभागाने ०.४४ दशलक्ष टन मालवाहतूक केली जी गेल्या वर्षीच्या ०.४१ दशलक्ष टनांच्या तुलनेत ७.३१% वाढ दर्शवते.  या विभागातील नाशिक येथून २९ एनएमजी रेक लोड केले आहेत जे आतापर्यंत नाशिकहून सर्वाधिक आहेत.

 पुणे विभागाने ०.११ दशलक्ष टन मालवाहतूक केली जी गेल्या वर्षीच्या ०.०९  दशलक्ष टन मालवाहतूकीच्या तुलनेत  २२.२% वाढ दर्शवते.  बीडीयूच्या पुढाकाराने जुलै २०२१ मध्ये ऑटोमोबाईल लोडिंगचे २० एनएमजी रेक मालवाहतूकीसाठी मिळाले.

लवचिक योजना, कमी दर, वेगवान वाहतूक, संरक्षित व सुरक्षित वाहतूक आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणास अनुकूल असल्याने व्यापार आणि उद्योगजगत त्यांच्या माल आणि वस्तूंची रेल्वेने वाहतूक करण्यास अधिकाधिक इच्छुक आहेत.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे