कल्याण-बनावट कागदपत्रांच्या आधारे रेरा प्रकरणात फसवणूक करून ६५ बेकायदा इमारती उभारल्याचे प्रकरण ताजे असताना कल्याणमध्ये बिल्डरने तलाठ्याची बनावट सही केली. तसेच बनावट शिक्काच्या वापर करुन तलाठी आणि शासनाची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी तलाठ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे महात्मा फुले पोलिस ठाण्यात बिल्डर सलमान डोलारे याच्या विरोधात फसवणूकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कल्याणचे तलाठी जर्नादन सूर्यवंशी यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, कल्याणमध्ये एका जागा मूळ मालक सुनिता वैद्य यांनी विकसीत करण्यासाठी घेतली. त्या जागेच्य विकास कामात बिल्डर डाेलारे हे भागीदार आहेत. या जागेचा सातबारा हा हस्तलिखित स्वरुपात आहे. या सातबाराची संगणकीय प्रत डोलारे यांनी काढली होती. त्यावर तलाठी सूर्यवंशी यांची बनावट सही केली. तसेच तलाठीचा बनावट शिक्का मारला आहे. त्याच्या बाजूला ३१ जुलै २०१५ अशी तारीख टाकली आहे. हा उतारा एकट्या डोलारे याच्या नावाचा असून त्याने त्याचा वापर जमीन मोजणी आणि मिळकत पत्रिकेवर नाव नोंदविण्यासाठी केला असल्याचे उघड झाले आहे.या पूर्वीच बिल्डर डोलारे याच्या विरोधात यूसूफ हाईट सह अन्य दोन ठिकाणी बेकायदा बांधकाम केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहे. त्याला पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही.