कॅब चालकाने केला प्रवासी तरुणीचा विनयभंग
By सचिन सागरे | Updated: October 15, 2023 16:05 IST2023-10-15T16:04:48+5:302023-10-15T16:05:14+5:30
नवी मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये २३ वर्षीय पीडित तरुणी काम करते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काम आटोपून कॅबने घरी येत असताना हा प्रकार घडला.

कॅब चालकाने केला प्रवासी तरुणीचा विनयभंग
कल्याण : नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने कॅबने प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा कॅब चालकाने प्रवासादरम्यान विनयभंग केल्याची घटना पूर्वेत घडली. तरुणीने आरडओरडा केल्याने कॅब चालक पळून गेला.
नवी मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये २३ वर्षीय पीडित तरुणी काम करते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काम आटोपून कॅबने घरी येत असताना हा प्रकार घडला. कॅब चालकाच्या या कृत्यानंतर पिडीत तरुणीने आरडाओरडा केला. ज्यामुळे घाबरलेल्या कॅब चालकाने पळ काढला.
याप्रकरणी पीडितेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात कॅब चालाकाविरोधात तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी कॅब चालक राकेश मिश्रा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कॅब चालकाचा शोध सुरू केला आहे.