कल्याणात पुन्हा बैलांची झुंज! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 17:29 IST2021-11-08T17:28:41+5:302021-11-08T17:29:05+5:30

कल्याण डोंबिवलीत अनेकदा बैलांच्या झुंजी लावण्याचे प्रकार समोर आले आहेत.मनाई असतानाही झुंज लावली जातं असून याप्रकरणी यापूर्वीही गुन्हे दाखल झाले आहेत.

Bullfighting again in Kalyan | कल्याणात पुन्हा बैलांची झुंज! 

कल्याणात पुन्हा बैलांची झुंज! 

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

कल्याण डोंबिवलीत अनेकदा बैलांच्या झुंजी लावण्याचे प्रकार समोर आले आहेत. मनाई असतानाही झुंज लावली जातं असून याप्रकरणी यापूर्वीही गुन्हे दाखल झाले आहेत. आता पुन्हा  कल्याण तालुक्यातील मानिवली परिसरात बैलांची झुंज आयोजित केल्याचा प्रकार समोर आला आहे.  

दाेन गावातील बैलांमध्ये ही झुंज लावण्यात आली होती. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी तपास सुरू केला असून आयोजकांवर गुन्हा दाखल होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. बैलाचा वाढदिवस साजरा करणे, बैल नाचवण , झुंज लावणे हे प्रकार कल्याण डोंबिवलीत अनेकदा समोर आलेत.मात्र अजुनही हे प्रकार खुलेआमपणे सुरू असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. आता मानिवली प्रकरणी कधी गुन्हा दाखल होतो ते पहावं लागेल.

Web Title: Bullfighting again in Kalyan