११ वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला खदाणीच्या पाण्यात

By प्रशांत माने | Updated: July 4, 2023 20:21 IST2023-07-04T20:20:43+5:302023-07-04T20:21:08+5:30

रविवारी कार्तिक हा खेळण्यासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडला.

Body of 11-year-old missing boy found in mine water | ११ वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला खदाणीच्या पाण्यात

११ वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला खदाणीच्या पाण्यात

प्रशांत माने

डोंबिवली: रविवारी खेळण्यासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडलेल्या ११ वर्षीय मुलाचा मृतदेह मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पुर्वेकडील नांदीवली परिसरातील खदाणीच्या पाण्यात आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कार्तिक पवार रा. पांडुरंगवाडी, शांतीनगर डोंबिवली पूर्व असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेची नोंद मानपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

रविवारी कार्तिक हा खेळण्यासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडला. तो रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. त्याचे वडील गोटुराम यांनी सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर स्थानिक टिळकनगर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. दरम्यान कार्तिकचा देह मंगळवारी दुपारी नांदीवलीतील खदाणीच्या पाण्यात तरंगत्या अवस्थेत आढळुन आला. याची माहीती मानपाडा पोलिसांना मिळताच पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सर्जेराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. कार्तिकला पाण्याबाहेर काढून केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता. डॉक्टरांनी तपासून तो मयत असल्याचे घोषित केले.

Web Title: Body of 11-year-old missing boy found in mine water