शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
2
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
3
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
4
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
5
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
6
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
7
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
8
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
9
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
10
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
11
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
12
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
13
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
14
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
15
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
16
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
17
नाशिकमध्ये सहा महिन्यांमध्ये १७ बलात्कार, अत्याचार होतात, गुन्हेही दाखल; पण...
18
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
19
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची भयानक अवस्था, रस्त्यावर सापडली, नसीरुद्दीन शाहांसोबत केलंय काम
20
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!

चालकांत रंगला भाड्यावरून वाद, मृतदेह ३ तास शवागारात; तेलंगणातील बांधकाम मजुराचे मृत्युनंतरही हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 09:24 IST

रुग्णवाहिका चालक शेख म्हणाला, कल्याण ते तेलंगणा हे अंतर जास्त असल्याने २५ हजार रुपये भाडे सांगितले. कोणत्याही रुग्णाची अडवणूक केलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातून तेलंगणाला एका मजुराचा मृतदेह नेण्यासाठी दोन खासगी रुग्णवाहिका चालकांमध्ये भाडे आकारणीवरून वाद सुरू झाल्याने मृतदेह शवागारात तीन तास पडून हाेता. 

करीया बिच्चप्पा मजुराचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी मृतदेह रुक्मिणीबाई रुग्णालयात नेला. मंगळवारी नातेवाइकांनी मृतदेह अंत्यविधीकरिता तेलंगणाला नेण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांकडे भाड्याची विचारणा केली. रुग्णालयाबाहेरील रुग्णवाहिका चालक रोशन शेख याने २५ हजार रुपये भाडे सांगितले. मजुराच्या नातेवाइकांनी भाड्याचे पैसे कमी करण्याची विनंती केली. त्याने नकार दिला. दुसरा खासगी रुग्णवाहिका चालक समीर मेमन याने १५ हजार रुपये भाडे सांगितले. मात्र पहिल्या चालकाने १५ हजार रुपये भाडे घेण्यास मज्जाव केला. त्यावरून त्या दोघांमध्ये तीन तास वाद सुरू होता. तेवढा वेळ मजुराचा मृतदेह शवागारात पडून होता. 

... आणि महिलेच्या जिवावर बेतले; पाच जण निलंबितकाही महिन्यांपूर्वी एका महिलेला रुक्मिणीबाई रुग्णालयातून उपचारासाठी कळवा रुग्णालयात हलविण्यात यावे, असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यावेळी रुग्णवाहिका चालकाने एक हजार रुपये भाडे सांगितले होते. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने महिलेचा मृत्यू झाला होता. रुग्णवाहिका चालकासह पाच जणांच्या विरोधात महापालिकेने निलंबनाची कारवाई केली होती.

रुग्णवाहिका चालक शेख म्हणाला, कल्याण ते तेलंगणा हे अंतर जास्त असल्याने २५ हजार रुपये भाडे सांगितले. कोणत्याही रुग्णाची अडवणूक केलेली नाही.

या प्रकाराची माहिती पालिका प्रशासनाने घेतली आहे. खासगी रुग्णवाहिकांनी सामान्यांना परवडणारे भाडे आकारावे. त्याचे दर आरटीओकडून निश्चित करण्यात यावेत, अशी सूचना आरटीओ कार्यालयाला महापालिका करणार आहे. हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त, कंडोमपा

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका